निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
27-04-2024
नुकसानग्रस्त शेतकऱ्याला भाग्यश्री ताई आत्राम यांची आर्थिक मदत
कोरेली येथे रानटी हत्तीने घराचे केले नुकसान
अहेरी:तेलंगाणा राज्यात दोन बळी घेऊन परत आलेल्या रानटी हत्तीने अहेरी तालुक्यातील कोरेली येथील दस्सा कोहला मडावी या शेतकऱ्याच्या घराचा नुकसान केल्याने माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी अतिदुर्गम कोरेली गाठत त्यांना आर्थिक मदत केले.
६ एप्रिल रोजी तेलंगणा राज्यातून प्राणहिता नदी ओलांडून भामरागड तालुक्यात गेलेल्या रानटी हत्तीने रेपणपल्ली वनपरिक्षेत्रात तब्बल १८ दिवस मुक्काम ठोकून बाहेर पडताच अहेरी तालुक्यातील चिरेपल्ली, कोत्तागुडम, ताडगूडा,कोरेली आदी गावात पिकांसह घरांचेही नुकसान केले.त्यानंतर सदर रानटी हत्ती भामरागड तालुक्यात दाखल झाले.या दरम्यान त्या रानटी हत्तीने या भागातील नागरिकांचा अतोनात नुकसान केले.
रानटी हत्तीने २४ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास आरेंदा जंगलातून पेरमेली गावातील तलावाजवळून कोरेली जंगलात प्रवेश केला. येथील शेतातील घरावर हत्तीने हल्ला करून पाडले. त्या घरात ७५ वर्षाची आजारी म्हातारी झोपून होती. सुरुवातीला हत्तीने म्हातारी झोपून असलेल्या घरावर हल्ला केला व त्यानंतर बाहेर झोपलेल्या व्यक्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी वेळीच गावाकडे धाव घेतल्याने ते सुदैवाने बचावले. दरम्यान कवेलूचे छत मातारीचा अंगावर कोसळले. ती म्हातारी रात्रभर तिथेच बसून होती. काही वेळाने गावातील नागरिकांनी धाव घेऊन म्हातारीला बाहेर काढले.मात्र तेंव्हापर्यंत रानटी हत्तीने घराचे छत,कवेलू, साहित्य, भांडी, मोहा, धानाची नासधूस केली.
याची माहिती मिळताच माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी कोरली गाव गाठून नुकसानग्रस्त शेतकऱ्याशी आस्थेने संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला व तात्पुरत्या स्वरूपात आर्थिक मदत करत शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याची ग्वाही दिली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments