अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
26-04-2024
परत गेलेले हत्ती आक्रमक होऊन परतले,घेतला एकाचा बळी, ब्राह्मणवाडे, कंकडालवार म्हणाले, तातडीने बंदोबस्त करा
गडचिरोली :
गेल्या वर्षभरापासून गडचिरोली जिल्हयात हत्तींनी धुमाकूळ माजविला आहे. गावागावातील शेतपिकांचे, घरांचे नुकसान करून तेलंगणात गेलेले हत्ती पुन्हा एकदा गडचिरोलीत दाखल झाले आहेत. आल्या आल्या त्यांनी एकाचा बळी घेतला. याप्रकारामुळे गडचिरोलीच्या दुर्गम भागात कमालीची धास्ती पसरली आहे. तेंदुपत्ताचा हंगाम तोंडावर आहे. अशात हत्तीच्या आगमनाने आता कस होणार, हि चिंता नागरिकांत आहे. दरम्यान कॉग्रेसचे नेते अजय कंकडालवार यांनी हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
मागील वर्षापासून गडचिरोली जिल्हयात मानव वन्यजीव संघर्ष कमालीचा वाढला आहे. वाघांनी अनेकांचा बळी घेतल्यानंतर रानटी हत्तीच्या एन्ट्रीने नागरिकांत कमालीची धास्ती पसरली. ओडिशातून छत्तीसगड मार्ग जिल्हयात दाखल झालेल्या हत्तीच्या कळपाने गडचिरोलीत मोठया प्रमाणावर नुकसान केली. अनेक दिवस मुक्काम ठोकल्यानंतर ते तेलंगणात गेले. यामुळे येथील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. तेलंगणात गेल्यांनतर त्यांनी तिथे अक्षरश रौद्र रूप धारण केल. दोघांचा बळी घेतला. अनं पुन्हा ते गडचिरोलीतील सिरोंचा वनविभागात दाखल झाले. ता. २५ ला एका नर हत्तीने भामरागड तालुक्यातील कियर येथील गोंगलू तेलामी यांचा बळी घेतला. या घटनेनंतर आता गडचिरोलीच्या दुर्गम भागातील नागरिकांत कमालीची धास्ती पसरली आहे
मागील वर्षापासून वाघांच्या हल्ल्यात अनेकांना आपले जिव गमवावे लागले होते. यानंतर हत्तीच्या धुमाकूळाने यात मोठी भर पडली. जिल्हयात यामुळे मानव वन्यजीव संघर्षाची ठिणगी पेटली आहे. पण अशा स्थितीत वनविभागाला याबाबत कुठलीच उपाययोजना करता आली नाही. हा मुददा घेत कॉग्रेसचे नेते अजय कंकडालवार यांनी वारंवार प्रशासनाकडे मागणी केली. काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे याबाबत त्यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. जिल्हयाचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. पण या गंभीर प्रश्नाकडे ते देखिल दुर्लक्ष करित आहेत. असा आरोप विरोधक करित आहेत.
दरम्यान आता कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, काॅंग्रेसचे नेते अजय कंकडालवार यांनी या मुद्द्याला घेत आक्रमक पावित्रा घेतला आहे. तेंदूपत्ता हंगाम सुरू होण्यावर आहे. जिल्हयातील शेकडो गावातील हजारो नागरिकांना यामाध्यमातून मोठा रोजगार उपलब्ध होत असतो. पण ऐनवेळी आता हत्तीनी धुमाकूळ घातल्याने तेंदूपत्ता हंगामावर भितीचे मोठे सावट आहे. अशा स्थितीत त्या हत्तींचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी महेंद्र ब्राह्मणवाडे, अजय कंकडालवार यांनी केली आहे
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments