संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
22-04-2024
विषप्राशन करून शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा.
कोरपना तालुक्यातील धक्कादायक घटना.
कोरपना:-
चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या कोरपना तालुक्यातील 'पिपर्डा' गाव येथे एका शेतकऱ्याने सावकाराच्या जाचाला कंटाळून विषप्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 20 एप्रिल रोजी समोर आली आहे.खुशाल राठोड वयवर्ष अंदाजे 62,असे मृत शेतकऱ्याचे नाव असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेली सदर घटना सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत असल्याचे बोलले जात आहे.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार सविस्तर असे की,मृत शेतकरी खुशाल राठोड यांनी मागील सन 1993-94 मध्ये बियाणे,रासायनिक खते व औषधी खरेदीसाठी एका सावकाराकडून 50 हजारांचे कर्ज घेतले होते.सदर रक्कम टप्प्या-टप्प्याने त्यांनी 1997 मध्येच परत केली.असे असताना मात्र,त्या सावकाराने लाखो रुपयांचे कर्ज दाखवून राठोडकडे वसुलीचा तगादा लावला.याविषयी राठोड यांनी स्वतः त्याची भेट घेऊन सांगितले होते की,माझ्याकडे कर्ज नसताना तुम्ही मला कसे काय नोटीस पाठवता.'तू मला दिलेल्या पैशांच्या पावत्या दाखव,अन्यथा तुझ्यावर मी कोर्टात दावा दाखल करतो’ असा दम सावकाराने दिल्याचे कळते.या कारणाने राठोड सतत चिंतेत रहायचं.
दरम्यान 4 दिवसापुर्वीच कारणे दाखवण्यासाठी न्यायालयाने त्याला 20 एप्रिल रोजी न्यायालाया समोर हजर राहण्याचे आदेश नोटीसद्वारे दिले होते.त्यामुळे पुन्हा राठोडच्या चिंतेत भर पडली. त्याने 19 एप्रिल रोजी आपला मतदानाचा हक्क बजावून 'मी कर्जापाई त्रस्त आहो,तो माझा जीव घेत आहे'असे रात्रभर बडबडत होता अशी माहिती आहे.20 एप्रिल रोजी कुटुंबातील सर्व जण शेताकडे जात असताना, 'मी कोर्टात जाणार आहे,तुम्ही शेताकडे जा.' असे राठोड यांनी त्यांना सांगितले.यामुळे घरचे सर्व शेताकडे निघून गेले.आणि त्याने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने विषप्राशन केले व उलट्या करतानाचे चित्र पाहून घरी असलेला नातू रडू लागला.हे ऐकून इंदल राठोड या शेजाऱ्याने राठोडच्या घराकडे धावा घेत पाहिले तर,त्याची प्रकृती खराब दिसली.त्याला तातडीने कोरपना ग्रामीण रुग्णालयात भरती केले.मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. दुर्दैवाने त्याचा प्रवासा दरम्यान मृत्यू झाला.
न्यायालयाचा आधार घेऊन त्या सावकाराच्या अशा पद्धतीच्या वसुलीमुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाल्याचे बोलले जात असून याच्या अशा कारभारामुळे कर्जदार शेतकरी मोठ्या प्रमाणात दहशतीत असल्याची चर्चा आहे. खुशाल राठोडच्या मृत्यूला तोच व्यक्ती जबाबदार असल्याचे आरोप करत याच्यावर 302 चा गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी त्याच्या पत्नी व मुलाने केली आहे. तसेच शासनाने तातडीने राठोडच्या परिवाराला मदत करावी व सावकारावर ताबडतोब कारवाई करावी,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस(अजीत दादा गट)प्रदेश सहसचिव सैय्यद आबीद अली, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष उत्तम पेचे व इतरांनी कुटुंबाच्या भेटी दरम्यान केली आहे.
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments