ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
22-04-2024
रेल्वे तिकिटांचा काळाबाजार : १४ दलालांना अटक
बल्लारपूर : नागपूर विभागांतर्गत आरपीएफ चंद्रपूर व नागपूरच्या पथकाने एकाच दिवसात १४ दलालांना अटक करून रेल्वे आरक्षण ई तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालावर कारवाई केली. उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि लग्नसराईमुळे गाड्यांमधील गर्दी सातत्याने वाढत आहे, त्याचा फायदा घेत एकीकडे रेल्वे आरक्षणाच्या ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांमुळे सर्वसामान्यांना तिकिटे उपलब्ध होत नाहीत. दुसरीकडे, असे दलाल गरजू प्रवाशांकडून मनमानी कमिशन वसूल करण्यास सुरुवात करतात, या संदर्भात माहिती मिळताच आरपीएफ नागपूरचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त मनोज कुमार यांनी आरपीएफ पोलीस स्टेशन चंद्रपूरचे निरीक्षक के.एन. राय आणि अखुशा नागपूरचे निरीक्षक एन.पी.सिंग यांना अशा दलालांची ओळख पटवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले. वरील सूचनांवरून आरपीएफ पोलीस स्टेशन चंद्रपूरच्या हद्दीत रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांच्या कारवायांवर पाळत ठेवण्यात आली. रेकी केल्यानंतर अशा दलालांवर कारवाई करण्यासाठी आरपीएफ पोलीस स्टेशन चंद्रपूर, अखुषा नागपूर आणि विभागीय मुख्यालय यांचे संयुक्त पथक तयार करण्यात आले आणि 20.04.2024 रोजी सदर पथकाची 5 भागात विभागणी करून वेगवेगळ्या शहरांमध्ये एकाच वेळी रेल्वे कायद्यांतर्गत छापे टाकण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर अचानक छापे टाकण्यात आल्याने दलालांना सावध होण्याची संधी मिळाली नाही. या छाप्यात चंद्रपूर शहरात 5 दलाल, घुग्गुस 5, वणी येथे 2, भद्रावती 1 आणि माजरी 1 असे 14 दलाल पकडले असून,त्यांच्या कडून 61तिकीट 132047/- रुपयांची, व 378434/- किंमतीची 210 तिकिटे जप्त करण्यात आली, अशा प्रकारे एकूण 5,10,481/- रुपयांची एकूण 271 तिकिटे जप्त करण्यात आली असून सर्व 14 एजंटांवर कारवाई करण्यात आली आहे.
सदर कारवाई मनोज कुमार वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफ निरीक्षक के. एन. रॉय, एन पी सिंह, उप निरीक्षक आर के यादव, हरवंश सिंह, प्रियांका सिंह, सचिन नागपुरे, एन पी वासनिक, आर के भारती, मुकेश राठोड, आश्विन पवार, विपिंन दातार, सागर भगत, वासुदेव, सुमित, शिरीन, सागर लाखे, वी एस यादव, हरविंदर, विकास, महीलाल यांनी केले.
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments