समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
11-04-2024
मार्कंडा कंन्सोबा येथे श्री संत कार्तिक स्वामी महाराजांच्या पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील चपराळा येथील प्रशांत घाम हनुमान मंदीर येथून प्रारंभ होऊन श्री संत कार्तिक स्वामी महाराजांची पालखी सोहळा रामनगट्टा मार्गे तालुक्यातील मार्कंडा कंन्सोबा येथे दिनांक १० एप्रिल रोजी आगमन होताच मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. या देवस्थानाचे अध्यक्ष संजय पंदिलवार यांनी स्वतः पालखी सोहळ्याचे स्वागत करून पालखीचे सारथ्य केले. तसेच पंदिलवार यांनी स्वागत केल्यानंतर भजनाचा आनंद लुटला. ते वारकऱ्यां समवेत भजन करीत असताना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना दाद दिली.
पालखी सोहळ्याचे मार्कंडा कंन्सोबा येथील वनविभागाच्या नाक्याजवळ आगमन होताच गावातील प्रतिष्ठित नागरिक अमोल पंदिलवार, माजी सरपंच गंगाधर पोटवार, सेवानिवृत्त वनरक्षक आत्माराम मस्के यांच्यासह गावकरी व ग्रामपंचायत पदाधिकारी आदींनी स्वागत केले. यावेळी प्रभाकर बावणे, प्रभाकर लोणारे,वसंत बावणे, रवी बुग्गावार आदींसह देखील स्वागत केले. टाळ मृदंगाच्या गजरात अभंगाच्या जयघोषात संपूर्ण मार्कंडा कंन्सोबा परिसर दुमदुमून गेला होता. दुपारपासून रखरखत्या उन्हात पालखी सोहळ्याची आतुरतेने वाट पाहणारे भाविक सायंकाळी पालखीचे दर्शन होताच भक्तीरसात तल्लीन झाले होते. मार्कंडा कंन्सोबा येथील पंदिलवार परिवाराच्या निवासस्थानी पालखी सोहळा पोहचताच प्रमुख व विश्वस्तांचे स्वागत पंदिलवार परिवाराच्या वतीने करण्यात आले. दरम्यान अबाल वृद्धांसह भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. मार्कंडा कंन्सोबा गावातील संजय पंदिलवार यांनी वैयक्तिक स्वरूपात वारकऱ्यांसाठी अल्पोपहार, चहा, नाश्ता व भोजनाची व्यवस्था केली.यानंतर पालखी सोहळा चंदनखेडी (खर्डी ) या ठिकाणी मुक्कामासाठी मार्गस्थ झाला.
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments