RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
11-04-2024
मुधोली चक येथील सुरज कोडापे बनलाय फौजदार.
अनु.जमाती मधून महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएसीमार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब परीक्षेतील पोलीस उपनिरीक्षक २०२१ परीक्षेत चामोर्शी तालुक्यातील मुधोली चक क्र.२ या गावातील सुरज वनिता रमेशजी कोडापे यांनी हे यश मिळवत आपल्या गावासह जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत(एम.पी.एस.सी)
२०२१ साली संबंधित पोलिस उपनिरीक्षक पदासाठी ३७६ पदांसाठी जाहिरात देण्यात आली होती. यासाठी पूर्व परीक्षा फेब्रुवारी २०२२ मध्ये झाली.मुख्य परीक्षा जुलै २०२२ मध्ये घेण्यात आली होती. त्यानंतर तब्बल दीड वर्षानंतर म्हणजे नोव्हेंबर २०२३ मध्ये शारीरिक चाचणी मुंबई येथे पोलीस मुख्यालयात पार पडली.या पदाची मुलाखत मार्च २०२४ मध्ये पार पडली.मात्र न्यायालयीन प्रकरणामुळे अंतिम निकाल लागण्यासाठी बराच काळ प्रतीक्षेत गेला. मोठ्या प्रतीक्षेनंतर हा निकाल जाहीर झाल्यामुळे निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
*शैक्षणिक पार्श्वभूमी*
सुरज यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले,पुढे जा.कृ.बोमनवार विद्यालय चामोर्शी,विश्वशांती विद्यालय भेंडाळा,जवाहर नवोदय विद्यालय घोट या महाविद्यालयांचा सुरज माजी विद्यार्थी राहिला आहे.विशेष म्हणजे इयत्ता १२ वी जवाहर नवोदय विद्यालय,घोट येथून भूगोल ह्या विषयात १०० पैकी ९९ गुण मिळाल्यामुळे सूरजला उत्कृष्ट विद्यार्थी सन्मान (Excellent Student Award), भूगोल विषयाच्या मेरिटसह तत्कालीन केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते दिल्ली येथील विज्ञान भवनात सत्कार करण्यात आला.त्यावेळेस देशातील १२० विद्यार्थ्यांशी पंतप्रधान मोदी ह्यांनी हितगुज साधले त्यापैकी सुरज एक होता.सूरजने पुढील शिक्षण पुण्यातून राज्यशास्त्र ह्या विषयात घेतले.विशेष म्हणजे सुरजचे नागपूर विद्यापीठातून पत्रकारितेत मास्टरदेखील झाले आहे.
*सामाजिक पार्श्वभूमी*
वडीलांच्या पुरोगामी आणि आईच्या आंबेडकरी विचारात सुरजचे बालपण गेले.त्यामुळे लहानपणापासून सूरजला सामाजिक चळवळीत काम करायची ओढ लागली.सुरजने स्थानिक पत्रकार म्हणून एक वर्ष काम केले.फुले,शाहू आंबेडकर चळवळीतील लोकांसोबत मिळून त्यांनी संविधान जागृतीसह,विद्यार्थ्यांना मोफत शिकविणे,रक्तदानासारखे सामाजिक उपक्रम घेतले.मागील काही वर्षात जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक आंदोलनात सुरज अग्रस्थानी राहिला आहे.
विशेष म्हणजे शिक्षणाचे महत्व केवळ नोकरीपुरते मर्यादित न ठेवता शिक्षणाची व्यापकता त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध करत पोलीस वर्दी घालण्याचे त्याने आपले स्वप्न पूर्ण केले.त्यामुळे सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते,शिक्षक, मित्रपरिवाराकडून सुरजवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
प्रतिक्रिया
२०१७ पासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतो. आईवडील तसेच मित्रांचा कायमच पाठिंबा आणि विश्वास होता.हे यश केवळ माझे नसून माझ्यावर विश्वास दाखविणाऱ्या माझ्या प्रत्येक समाज बांधवांचे व गुरुवर्य,मित्रपरिवाराचे आहे.यापुढे सुद्धा अभ्यास सुरू ठेवून यापेक्षा चांगल्या पदासाठी तयारी करणार आहे.हा क्षण माझ्याबरोबरच जिल्ह्यातल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चैतन्याचा आहे.संयमाने सातत्य ठेवून प्रामाणिक प्रयत्न केल्यास प्रत्येक क्षेत्रात यश मिळते.
सुरज वनिता रमेश कोडापे
पोलीस उपनिरीक्षक
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments