CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
08-04-2024
ईव्हीएम-व्हीव्हीपॅटचे द्वितीय रँडमायझेशन पूर्ण
गडचिरोली दि.8: लोकसभा निवडणुकीकरिता जिल्ह्यातील मतदान केंद्रावर वितरीत करावयाच्या बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट या मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळीकरणाची (रॅण्डमायझेशन) प्रक्रिया निवडणूक निरीक्षक अनिमेश कुमार पराशर यांच्या हस्ते व जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने तसेच उमेदवाराचे प्रतिनिधी व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी समोर आज पूर्ण करण्यात आली. यातून ईव्हीएम मशिन कोणत्या मतदान केंद्रावर जाणार याची निश्चिती झाली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राष्ट्रीय सूचना केंद्रात ईव्हीएम ची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे पूर्ण करण्यात आली. सदर सरमिसळ करतेवेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा अधिकारी संजय दैने यांनी उपस्थित उमेदवारांच्या प्रतिनिधी तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी समक्ष पार पडलेल्या द्वितीय सरमिसळ प्रक्रिये नुसार विधानसभा मतदारसंघातील कोणत्या मतदान केंद्रावर कोणत्या क्रमांकाचे कंट्रोल युनीट, बॅलेट युनीट आणि व्हीव्हीपॅट वापरली जाईल, याबाबत माहिती दिली. त्यानंतर सदर सरमिसळ प्रक्रिया उमेदवाराचे प्रतिनिधी व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांच्या समक्ष करण्यात आली आणि जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या ईव्हीएम, व्हीव्हीपॅट विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येक मतदान केंद्रासाठी निश्चित झाल्या.
गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात मतदान केंद्रांची संख्या 1891 असून यासाठी 2330 बॅलेट युनिट (बीयू), 2330 कंट्रोल युनीट(सीयू) आणि 2517 व्हीव्हीपॅट उपलब्ध झाल्या आहेत. यापैकी द्वितीय सरमिसळ प्रक्रिये नुसार आमगाव विधानसभा मतदारसंघातील 311 मतदान केंद्रासाठी (बीयू – 404, सीयू – 404 आणि व्हीव्हीपॅट - 435), आरमोरी विधानसभा मतदारसंघातील 302 मतदान केंद्रासाठी (बीयू – 362, सीयू – 362 आणि व्हीव्हीपॅट - 392), गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील 356 मतदान केंद्रासाठी (बीयू – 427, सीयू – 427 आणि व्हीव्हीपॅट - 462), अहेरी विधानसभा मतदारसंघातील 292 मतदान केंद्रासाठी (बीयू – 350, सीयू – 350 आणि व्हीव्हीपॅट - 379), ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातील 316 मतदान केंद्रासाठी (बीयू – 395, सीयू – 395 आणि व्हीव्हीपॅट - 426) आणि चिमुर विधानसभा मतदारसंघातील 314 मतदान केंद्रासाठी (बीयू – 392, सीयू – 392 आणि व्हीव्हीपॅट - 423) ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट निश्चित झाल्या आहेत.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट व्यवस्थापन कक्षाचे नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विवेक साळुंखे, जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी शिवशंकर टेंभुर्णे, अतिरिक्त जिल्हा सूचना अधिकारी संजय त्रिपाठी, तहसिलदार रविंद्र होळी उमेदवाराचे प्रतिनिधी व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी सर्वश्री करण सयाम, राजेंद्र कोडापे, भारत खटी, गोपाळ खानवळकर, दत्तात्रय खरवडे, मिलिंद लांडे, रोशन कोडापे व श्री शेंडे आदी उपस्थित होते.
०००००
Redefine your style
book your appointment now
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments