STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
10-03-2024
दुर्लक्षित आरमोरीकर स्वच्छता दूतांचा सत्कार,सामाजिक कार्यकर्त्या विभाताई बोबाटे यांचा पुढाकार
सत्कारमूर्ती महिलांचे डोळे पाणावले
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली): येथील सामाजिक बांधिलकी जोपासून सतत सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या विभाताई बोबाटे यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आरमोरी क्षेत्रातील दुर्लक्षित महिला स्वच्छता दूतांचा साडी चोळी व पुष्पगुच्छ देऊन स्थानिक गाढवी नदीच्या तीरावरील शिवमंदिर येथे सहृदय सत्कार केला.
सर्व प्रथमतः क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवर महिलांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून समाजसेवा क्षेत्रातील अग्रणी महिला भगिणी ज्योती बगमारे,उमा कोंडापे, आशा बोळणे, स्मिता उईके, सीमा मडावी,अल्का पेटकुले,रोशनी झिमटे, लता लोणारे, स्नेहा मडावी,रोहिनी सहारे, स्नेहा बगमारे, लक्ष्मी कोडापे आरती लठ्ठेआदी मान्यवर उपस्थित होत्या.
कार्यक्रमात जयमाला पिंपळकर, शशीकला सपाटे,जयश्री कांबळे,लता खेडकर, यशोदा रामटेके, निर्मला कांबळे,उषा हेमके, सिंधू नारनवरे,मिरा बेहरे आदी महिलांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी आरमोरी शहरातील स्वच्छतेचे काम करून आरमोरीकरांना निरोगी व सुदृढ आरोग्य प्रदान करणारे घटक हे नेहमी दुर्लक्षित असतात.त्यांच्यांकडे सामान्यजण हे फक्त हिणकस नजरेने पाहत असतात.स्वच्छतेचे काम झाले की त्यांच्याकडे कुणीही आस्थेने विचारपूसही करीत नाही.अशा दुर्लक्षित परंतु बहुमूल्य असणाऱ्या एक-एक महिलांची निवड सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या 'हिरकणी'ने म्हणजेच विभाताईने केली.आता उरला प्रश्न त्यांच्या मानसन्मानाचा!तर त्यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्वागत समारंभ व महाप्रसादाचे आयोजन करून सर्व महिला भगिणींचा यथोचित गौरव केला.त्यावेळी
उपस्थित सत्कारमूर्ती महिला गदगदल्या.सर्व सत्कारमूर्ती महिलांचे डोळे पाणावले.'आमच्यासारख्या उपेक्षित, दुर्लक्षित स्वच्छता दूतांचा मानपान करून केलेला सन्मान आम्ही जिवंत असेपर्यंत विसरणार नाही.समाजसेवा करणारेही भरपूर आहेत.परंतु वंचित, दुर्लक्षित घटकांकडे आस्थेने पाहणारे डोळे व दातृत्वाचे हात मात्र कमी होत आहेत.अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.' सत्काररुपी मानसन्मानाने सा-या महिला गदगदून गेल्या व आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
मान्यवर महिलांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.सर्व उपस्थित महिलांचे आभार मानून महाप्रसादाचे वितरण करण्यात आले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments