नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
08-03-2024
कुरुड गावातील निर्घून हत्येचा पर्दाफाश
(गडचिरोली पोलीसांनी केले आरोपीस जेरबंद)
गडचिरोली : 8 फेब्रुवारी रोजी अज्ञात आरोपीने कोणत्यातरी साधनाने मृतक प्रदिभ ऊर्फ पांड्या विजय घोडेस्वार, (30) रा. कुरुड (ता. देसाईगंज), यांच्या डोक्यावर मारुन गंभीर जखमी केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. त्यानुषंगाने देसाईगंज पोलिस ठाण्यात मर्ग क्रमांक 04/2024 कलम 174 जाफौ. अन्वये अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती. या प्रकरणाचा अधिक तपास करुन मय्यत प्रतिभ ऊर्फ पांड्या विजय घोडेस्वार यांना ठार मारणाऱ्या अज्ञात आरोपीविरुध्द पोलिस उपनिरीक्षक संजय गोंगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलीस स्टेशन देसाईगंज येथे 28/02/2024 रोजी अप क्र. 065/2024 कलम 302 भा.दं.वि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्रातील अनोळखी आरोपीने कोणत्याही स्वरुपाचा पुरावा अथवा दुवा मागे सोडलेला नसल्याने सदर गुन्ह्रातील अनोळखी आरोपीचा शोध घेवून त्यास अटक करणे हे गडचिरोली पोलिसांपुढे मोठे आव्हान होते.
सदर गुन्हा अत्यंत गंभीर स्वरुपाचा असल्याने घटनेचे गांर्भीय लक्षात घेता पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा गुन्हा उघडकीय आणून आरोपीस अटक करण्याकरीता कुरखेडाचे उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र भोसले यांनी पोलिस निरीक्षक अजय जगताप यांच्या नियंत्रणाखाली एक तपास पथक नियुक्त केले. त्याप्रमाणे तपास पथकाने कुरुड गावातील लोकांकडे विचारपूस करण्यास सुरुवात केली असता, साक्षीदारांचे बयाणावरुन व पोलिस उपनिरीक्षक धनगर, पोलिस अंमालदार ढोके यांनी मिळविलेल्या गोपनिय बातमीदारांच्या माहितीवरुन संशयीत इसम विकास जनार्दन बोरकर (50) रा. कुरुड (ता. देसाईगंज याची गुन्ह्राच्या अनुषंगाने अधिक विचारपूस करुन तपास केला असता, त्याने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यास सदर गुन्ह्रामध्ये 6/03/2024 रोज सायंकाळी 5 वाजता अटक करण्यात आली.
अधिक तपासात असे दिसून आले की, मय्यत हा आरोपीची पत्नी व मुलगी यांच्याकडे वाईट नजरेने बघायचा व त्यांना वाईट वाईट कमेंट करायचा तसेच त्यांच्या घरासमोर येऊन अश्लील शिवीगाळ करायचा. त्यामुळे मय्यत व आरोपी यांच्यात नेहमी झगडा भांडण होत होते. दरम्यान, 8/02/2024 रोजी रात्रो 10 वाजताच्या दरम्यान मय्यताने आरोपीस अश्लील भाषेत वाईट वाईट शिवीगाळ केल्याने आरोपीने मय्यताचे डोक्यात सिमेंटच्या कवेलुने मारुन गंभीर जखमी करुन खून केल्याची माहिती समोर आली.
सदर गुन्ह्रात कोणतेही पुरावे नसताना केवळ गोपनीय माहितीच्या आधारावर आणि साक्षिदारांचे बयाणावरुन आरोपीस निष्पन्न करुन त्यास अटक करुन अत्यंत गंभीर व क्लिष्ट स्वरुपाचा गुन्हा उघडकीस आणण्यास गडचिरोली पोलीस दलास यश आले. आरोपीला देसाईगंज येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे समक्ष रिमांडकामी हजर केले असता, न्यायालयाने आरोपीस 7 ते 11 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर गुन्ह्राचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अजय जगताप यांच्या नेतृत्वात पोउपनि. ज्ञानेश्वर धनगर, पोना/राऊत, पोअं/ढोके, पोअं/ कुमोटी, पोअं/ सराटे व पोअं/शैलेश तोरपकवार यांनी केलेली आहे
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments