अमित मेडिकल स्टोर & निर्मल जल, गडचिरोली
निर्मल जल शुद्धतात का वादा
26-02-2024
आजाराने ग्रस्त असलेल्या शालेय विद्यार्थ्यिनीना माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी दिला मदतीचा हात
आष्टी प्रतिनिधी : मुलचेरा तालुक्यातील सुंदरनगर येथील शालेय विद्यार्थ्यिनीं जयंती दास ही गंभीर आजाराने ग्रासले असल्याने सदर माहिती सुंदरनगर येथील भारत राष्ट्र समितीच्या पदाधिकारीऱ्यांनी माजी आमदार दिपक दादा आत्राम व माजी जिल्हा परिषद सदस्य अनिता दिपक आत्राम यांना दिली लगेच जयंती दास यांच्या कुटुंबीयांना घरी बोलावून तब्बेतीची विचारपूस करून मुलीचं आरोग्य सुदृढ होण्यासाठी आर्थिक मदत करून रुग्णालयात जाण्यास मदत केल्याने मोठा आधार मिळाला आहे.
दास कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने हलाखीचे जीवन जगत असताना त्यांच्या मुलीला गंभीर आजाराने ग्रासल्याने जेमतेम परिस्थिती असतानाही मुलीच्या आजारासाठी खाजगी रुग्णालयात वाटेल ते खर्च करून आजार दूर होईल यासाठी प्रयत्न केले. मात्र आजार दूर न झाल्याने आणि आपल्या परिवाराचा प्रपंच चालवण्यासाठी आजारामुळे आर्थिक चणचणीत आलेल्या कुटुंबाला जणू देवदूतच मिळाले. मुलीच्या प्रकृतीसाठी कोणी मदतीचा हात समोर करत नसताना माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी संकट समयी मदतीचा हात समोर करून मुलीला गंभीर आजारातून दूर करण्यासाठी आर्थिक मदत करून रुग्णालयास तात्काळ घेऊन जाण्यास सांगितले.
त्यामुळे परिवाराला कठीण समयी देवदूतच उतरले असून आम्हाला मोठ्या संकटातून काढण्यासाठी मदत झाल्याने दास परिवाराकडून दिपक दादा आत्राम यांचे कौतुक केले. यावेळी बिनोता दास,रामेन सरकार, आविसं पदाधिकारी दिनेश बहादुर,वेलगुरचे सरपंच उमेश मोहूर्ले,जुलेख शेख, प्रवीण रेषे, विनोद कावेरी, सुधाकर कोरेत,संदीप बडगे उपस्थित होते
निर्मल जल शुद्धतात का वादा
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments