संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
23-02-2024
ज्या परिक्षा केंद्रावर काॅपी आढळून येईल त्या ठिकाणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तीव्र रोष व्यक्त करेल निवेदनातून दिला इशारा
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे जगातील सगळ्यात मोठे विद्यार्थी संघटन आहे, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना होणाऱ्या अडचणी व शैक्षणिक भ्रष्टाचार रोखण्याकरिता अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उपक्रम अभियान राबवीत असते, त्याच अनुषंगाने बारावीच्या परीक्षा सुरू आहेत, बोर्डाच्या परीक्षेवेळी अनेक परीक्षा केंद्रांवर कॉपी सारखे प्रकार उघडकीस येतात. त्यामुळे अनेक प्रामाणिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते व शैक्षणिक क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार वाढतो. याला थांबवण्याकरिता अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कॉपीमुक्त परीक्षा अभियान हे राबवित आहे. यामध्ये ज्या परीक्षा केंद्रावर कॉपी आढळून येईल त्या ठिकाणी अभाविप तीव्र रोष व्यक्त करेल, सर्व परीक्षा केंद्रांवर कॉपीमुक्त परीक्षा होण्याकरिता आपण आपल्या स्तरावरून विशेष प्रयत्न करावे, व ज्या परीक्षा केंद्रांवर कॉपी प्रकार आढळून येईल अशा परीक्षा केंद्राला शासनाच्या निर्देशानुसार तात्काळ वेळीच योग्य ती कारवाई करावी व यामध्ये पूर्णतः पारदर्शकता असावी अशी मागणी करत..अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, अहेरी जिल्हा द्वारा कॉपी मुक्त परीक्षा केंद्र याकरिता अहेरी नायब तहसीलदार .कल्पना स्वपम , गटविकास अधिकारी मा. श्री.कांबळे सर,अहेरी सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी सोनुने तसेच सहाय्यक प्रकल्प अधिकारी.सुहास वसावे सर..यांना निवेदन देण्यात आले.यावेळी आलापल्ली नगर मंत्री व प्रांत कार्यकारिणी सदस्य रोहित व्ही. मुक्कावार,अहेरी नगरसह मंत्री आयुष मामिडवार,अहेरी नगर कार्यकर्ता संजय तिम्मा, करण मारशेट्टीवार,अजित पोदादी उपस्थिती होती..
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments