रोज ब्युटी पार्लर
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
23-02-2024
आष्टी पोलिसांची धडक कारवाई
देशी दारूची अवैध वाहतूक करणारे चारचाकी वाहन पकडले ; २ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त !
चामोर्शी : गडचीरोली जिल्ह्यात दारूबंदी असली तरी चंद्रपूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणत देशी - विदेशी दारूचा पुरवठा केला जात असल्याचे दिसून येत आहे.
दि.२२ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता गोंडपिपरी हून आष्टी मार्ग गडचीरोली जिल्ह्यात देशी दारूची वाहतूक करणारे वाहन आष्टी पोलिसांनी पकडले त्यामुळे अवैध देशी दारूची तस्करी करणारे मोठे रॅकेट असल्याची दाट शक्यता आहे.
गोंडपिपरी -आष्टी मार्गावर एका चारचाकी वाहनाने अवैध देशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती आष्टी पोलिस स्टेशनचे ठाणेदार कुंदन गावडे यांना मिळाली असता पोलीस सहकाऱ्यांना घेवून आष्टी आलापल्ली मार्गावर चौडामपल्ली रस्त्यावर पोलिस तैनात केले. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाची तपासणी करीत असताना एम एच ३४ ए ए ५३६८ क्रमांकाची चारचाकी वाहन भरधाव वेगाने येताना दिसताच अडवून तपासणी केली असतासदर वाहनात खाकी खरड्याच्या बॉक्स मध्ये २ पेट्या देशी दारूच्या सापडल्या ज्यावर रॉकेट देशी संत्रा प्रवरानगर डीस्टीलरी असे लाल रंगाने लिहलेले होते. खोक्यात ९० मिली मापाचे १०० टिल्लू दिसून आले. दोन खोक्यात मिळून एकूण २०० निपा सापडले. प्रति निप ज्याची अवैध किंमत ८० रुपये दराने १६००० रुपये व पांढऱ्या रंगाच्या चार चुंगडी मध्ये देशी दारूच्या २०० नीपा सापडल्या असे एकूण ८०० निपा प्रति नीपची अवैध किंमत ८० रू प्रमाणे ६४,००० रुपये असा एकूण ८० हजार रुपये व चारचाकी वाहनांची किंमत २ लाख रुपये असा एकूण २ लाख ८० हजाराचा मुद्देमाल आष्टी पोलिसांनी जप्त करत आरोपी सागर विलासराव चर्लावार वय ४२ वर्ष रा. गोंडपीपरी जी.चंद्रपूर यावर कलम( ६५ अ )महाराष्ट्र दारू कायदा नुसार गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक निलोत्पल,अप्पर पोलीस अधीक्षक चिंता सर, उपविभागीय पोलिस अधिकारी कोकोटे,
यतिश देशमुख,यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलिस स्टेशनचे ठाणेदार कुंदन गावडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अतुल तराळे,राजू येंनगंटीवार,अतुल तोडासे ,राजूरकर,संतोष नागुलवार यांनी केली आहे.
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments