ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
23-02-2024
पोलीस दलाकडुन 13 गुन्हयातील एकुण 407 किलो जप्त अंमली पदार्थ (गांजा) नाश
गडचिरोली : दिनांक 22.02.2024 रोजी मा. पोलीस अधीक्षक गडचिरोली यांचे अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या अंमली पदार्थ नाश समितीने गडचिरोली घटका अंतर्गत येणाया विविध पोलीस स्टेशन मधील अंमली पदार्थासंदर्भात दाखल असलेल्या विविध 13 गुन्हयातील जप्त अंमली पदार्थ (गांजा) मुद्देमाल शासनाने निर्गमीत केलेल्या कारवाई प्रमाणे नाश केला.
सदर कारवाई दरम्यान पोस्टे गडचिरोली येथील 4 गुन्हे, पोस्टे असरअल्ली येथील 2 गुन्हे, पोस्टे अहेरी येथील 3 गुन्हे, पोस्टे चामोर्शी, धानोरा, मुलचेरा, उपपोस्टे रेपनपल्ली येथील प्रत्येकी 1 गुन्हे असे एकुण 13 गुन्ह्रातील एकुण 407.095 कि.ग्रॅ. अंमली पदार्थ (गांजा) नाश करण्यात आला.
अंमली पदार्थ नाश समितीचे अध्यक्ष पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., सदस्य अपर पोलीस अधीक्षक (अभियान). श्री. यतिश देशमुख सा., प्र. पोलीस उप अधीक्षक (मुख्या.) गडचिरोली श्री. विश्वास जाधव, तसेच पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली. श्री. उल्हास पी. भुसारी, न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा नागपुर येथील सहा. रासायनिक विश्लेषक, श्री. विलास शिवाजी ठानगे, वजन मापे विभागाचे प्रतिनिधी निरीक्षक श्री. प्रकाश ऊके, जिल्हा परिषद गडचिरोली येथील पंच श्री. लाचुलु मडावी, श्री. अक्षय राऊत यांचे उपस्थितीत गडचिरोली घटकातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत एकुण 13 गुन्ह्रातील अंमली पदार्थ (गांजा) नाश करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. नीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) मा. श्री. यतिश देशमुख सा. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. उल्हास भुसारी, मपोउपनि सरीता मरकाम, स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस अंमलदार नरेश सहारे, दिपक लेनगुरे, प्रेमानंद नंदेश्वर, शुक्राचारी गवई, राकेश सोनटक्के, हेमंम गेडाम, सुनिल पुठ्ठावार, माणिक दुधबळे, उमेश जगदाळे, माणिक निसार, मनोहर टोगरवार यांनीे पार पाडली.
-
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments