ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
20-02-2024
जय भवानी-जय शिवाजी या घोषणांच्या निनादात आष्टी शहरात शिवजयंती उत्साहात साजरी
चामोर्शी (आष्टी) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त दि.१९ फेब्रुवारी रोजी जय भवानी-जय शिवाजी या घोषणांच्या निनादात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
आष्टी शहरातील श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्थेच्या वतीने दि.१८ ते १९ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले व दिनांक १८ रोजी ह.भ.प.नागापूरे महाराजांचे किर्तन व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या रांगोळी स्पर्धेचे उद्घघाटन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आष्टी शहरात कार्यक्रम घेण्यात आले सकाळी आष्टी - अनखोडा - उमरी - पर्यंत बाईक रॅली काढण्यात आली या बाईक रॅलीत आमदार डॉ देवराव होळी हे या रॅलीत सहभागी झाले होते व सायंकाळी ६ वाजल्यापासून शहरातील प्रमुख ठिकाणाहून छत्रपती शिवाजी महाराजांची म्युझिकल बॅंड,,ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढून जल्लोष करण्यात आला काढलेल्या मिरवणुकीमुळे वातावरण शिवमय झाले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रॅलीचे आगमन होताच खासदार अशोक नेते उपस्थित झाले व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पार्पण करून आदरांजली वाहिली शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्ताने चौकातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला खासदार अशोक नेते यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले यावेळी भाजपा पदाधिकारी संजय पंदिलवार, ग्रामपंचायत सदस्य दिवाकर कुंदोजवार, विठ्ठल आवारी,पांडे, तसेच मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते
या मिरवणुकीदरम्यान पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांनी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments