RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
17-02-2024
पप्पा चालाना घरी,जेवण नाही करत का.? चिमुकल्याची हृदयस्पर्शी विनवणी.
'कांबळें'च्या अन्नत्याग आंदोलनाचा पाचवा दिवस,दखल नाही.
गडचांदूर :-
दि सेंच्युरी लिमिटेडच्या अल्ट्राटेक युनिट क्रमांक 2,माणिकगड सिमेंट कंपनीने या शहराची वाट लावली आहे.गडचांदूर शहराच्या जवळपास 50 हजार लोकसंख्येतून 50 टक्के लोक आजारी पडत आहे.प्रदुषण नियंत्रण मंडळ याठिकाणी कार्यरत आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदुषण नियंत्रण मंडळ फक्त कंपनीची डिपॉझीट जप्त करून,जर कारवाई केल्याचे दाखवत असेल तर,ती केवळ तोंडाला पाने पुसण्याची बाब आहे.ज्या कंपनीमुळे या गावचे जल,जंगल,जमीन,नष्ठ होत आहे,लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे,ऐवढेच नाही तर याठिकाणी बेरोजगारांची फौज उभी झालेली आहे.या बेरोजगारांच्या हाताला काम नाही,मग काय चोऱ्या करायच्या का ? अशी विचारणा तरूण करताना दिसत आहे.शिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला काम नसल्याने कित्येक शिक्षित तरूण वाम मार्गाने जाऊन आपले भविष्य अंधारात टाकत असल्याचे दिसून येत आहे.काही अपवाद वगळता माणिकगड सिमेंट कंपनीने स्थानिकांच्या नावाखाली केवळ परप्रांतीयांचा भरण करून स्थानिक पात्र शिक्षित तरुणांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केल्याचे संतापजनक आरोप होत आहे.
एकीकडे बेरोजगारीची समस्या बिकट असतानाच दुसरीकडे या कंपनीच्या डस्ट प्रदूषणामुळे गडचांदूर व परिसरातील नागरीकांचे जीव धोक्यात आले आहे.दमा,फुफ्फुस,हृदयाचे विकार,शरीरावर खाज,खुजली,खोकला,इतर जीवघेण्या रोगांची लागन होत आहे.यासर्व जीवघेणा समस्यांवर उपाययोजना सकारात्मक तोडगा काढण्यासाठी मनसे कोरपना तालुकाध्यक्ष 'सुरेश कांबळे' यांनी गडचांदूर येथे गेल्या 14 फेब्रुवारी पासून 'अन्नत्याग आंदोन' सुरू केले आहे.आज आंदोलनाचा पाचवा दिवस असून शासन-प्रशासन,लोकप्रतिनिधी,कंपनी प्रशासन,यापैकी कुणीही याची दखल घेतली नसल्याने आश्चर्ययुक्त खंत व्यक्त होत आहे.दरम्यान आंदोलनकर्ते 'सुरेश कांबळे' गेल्या चार दिवसापासून आपल्या घरी न गेल्याने त्यांचा साडे तीन वर्षाचा मुलगा आंदोलनस्थळी येऊन कांबळेंच्या जवळबसून "पप्पा घरी चालना,जेवण नाही करत का ?" अशी विनवणी करत होता.चिमुकल्याच्या या हृदयस्पर्शी विनवणी ऐकून आंदोलन मंडपात उपस्थित लोकांचे मन हेलावून गेले होते.
माणिकगड{अल्ट्राटेक}सिमेंट कंपनीकडून दैनंदिन होत असलेल्या डस्ट प्रदूषणामुळे शहरातील जनता मोठ्या प्रमाणात त्वचा रोग,किडनी विकार,दमा,असे गंभीर आजाराने त्रस्त आहे.यावर संबंधित कंपनीवर कठोर कार्यवाही व्हावी,कंपनीने दत्तक घेतलेल्या गावांचा सीएसआर फंडातून विकास करावा,दत्तक घेतलेल्या गावातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना पॅकिंग प्लांट व सप्लाय वेजबोर्ड नुसार कामावर सामावून घ्यावे व स्थानिकांना प्राधान्य द्यावे,कंपनीतील ट्रान्सपोर्ट वाहने नो-पार्किंग झोन मधील व शहराच्या परिसरात उभे केलेल्या वाहनांवर कठोर कारवाई करून रस्ता मोकळा करावा व इतर जनहिताच्या मागण्या घेऊन कांबळे यांनी सदर आंदोलन सुरू केले आहे.ह्या सर्व मागण्या मार्गी लागल्याशिवाय आता माघार नाहीच ! या भूमीकेवर कांबळे ठाम असून समर्थकांमध्ये कंपनी विरोधात रोष व्यक्त होत आहे.गोवारीगुडा,बांबेझरी,नोकारी,मानोली,पुगडीपठार,जामनी,थुट्रा व परिसरातील इतर गावातील तरूणांची उपस्थिती होती.आता सदर आंदोलनाचे पुढे काय होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments