निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
13-02-2024
अखेर मनेराजाराम येथील धान खरेदी केंद्राविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल
भामरागड;- मणेराजाराम अविका धान खरेदी केंद्रावर अखेर सामाजीक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांच्या पुढाकाराने पोलिसात तक्रार दाखल केली आहे
सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की सामाजिक कार्यकर्ते यांनी 21 जानेवारी 2024 रोजी परिपत्रकाद्वारे जनतेला धान खरेदी केंद्रावर लूट झाल्यास काळविण्याचे आव्हान केले होते त्या अनुषंगाने मणेराजाराम येथील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते ताटिकोंडावार यांच्या कडे आपली व्यथा मांडली व परिसरातील नागरिकांच्या विनंतीला अनुसरून ताटिकोंडावार यांनी आपली टीम घेऊन मणेराजाराम गाव गाठले व नागरिकांना विचारणा केली असता तेथील नागरिकांनी निडरपने सांगितले की आपली खरेदी केंद्रावर लूट होत आहे आम्ही अनेकवेळा व्यवस्थापकाला विचारणा केली असता आम्हाला उडवाउडवीची उत्तर मिळत होते
ही समस्या ऐकून ताटिकोंडावार धान खरेदि केंद्रावर जाऊन संबंधितांना विचारणा केली की कश्या पद्धतीने धान खरेदी करता या वर संबंधितांनी आम्ही शासनाच्या धोरणाप्रमाणे 40.600 घेतो अशे उत्तर दिले
परंतु ताटिकोंडावार यांनी स्वत काही पोत्यांचे वजन केले असता 41.900 व 42.250 अशी शेतकऱ्यांची महालूट आढळून आली यावरून शेतकऱ्यांची गोणी मागे दोन ते अडीच किलो लूट दिसून आली म्हणजे सरासरी क्विंटलमागे 5 किलो संबंधिताला या विषय विचारणा केली असता कोणतेही उत्तर न मिळाले व सरपंच गाव पाटील व नागरिकांना घेऊन पोलीस स्टेशन गाठले व पोलीस स्टेशन मध्ये मनेराजाराम अविका धान खरेदी विरुद्ध तक्रार दाखल करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटिकोंडावार यांनी केली आहे
पोलीस स्टेशननला तक्रार करताना सरपंच शारदा कोरेत इंदरशाह मडावी समवेत मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्तीत होते
बॉक्स
शासन खरेदी केंद्र किंवा अभिकर्ता संस्थांकडून ओलाव्याची तुट गृहित धरुन ३८ किलो ५०० ग्रॅम वजन धानाचीच उचल करीत असल्याने शेतकऱ्यांकडून 41 ते 42.250 किलो प्रती गोणी (पोते) वजनाने केली जात असलेली खरेदी ही शुध्द लुट आहे.
*सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार*
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments