संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
09-02-2024
जखमी वाघावर प्राणी संग्रहालय गोरेवाडा येथे होणार उपचार
गडचिरोली:-
दिनांक ०५/०२/२०२४ रोजी रात्रो ९.०० वाजेदरम्यान एम. एन. चव्हान, सहाय्यक वनसंरक्षक वडसा वनविभाग वडसा यांना भ्रम्हणध्वनीव्दारे एक वाघ जखमी असल्याचा माहीती मिळाल्या नंतर वनपरिक्षेत्र अधिकरी वडसा व सहाय्यक वनसंरक्षक वडसा यांनी रात्रो शिवराजपुर ते उसेगाव रस्त्यावर जावुन पहाणी केली असता वडसा उपक्षेत्रातील नियतक्षेत्र शिवराजपुरचे कक्ष. क्रमांक. ९३ मधे वनक्षेत्रात रस्ता क्रास करूण एक जखमी वाघ लंगडत शिवराजपुर लगतचे शेतशिवारात गेल्याचे माहीती मिळाली तसेच सदर वाघ रस्ता ओलांडत असत्यांनाचा व्हिडिओ ची पाहणी केली असता एक जखमी वाघ ज्याच्या समोरच्या उजव्या पायाला जखम असुन लंगडत चालत असल्याचे दिसुन आले त्यानुसार रात्रो ११.३० वाजता ड्रोन कॉमेरा बोलावुन पहाणी केली असता ड्रोनमध्ये शिवराजपुर ते उसेगाव रस्त्यापासुन अंदाजे २०० मीटर अंतरावर शेतात झोपलेल्या अवस्थेत दिसुन आला. तेव्हा रात्रोभर सदर वाघावर क्षेत्रीय कर्मचा-या कडुन पाळत ठेवण्यात आली. व जवळील गांवाना सर्तक करण्यात आले.
दिनांक ०६/०२/२०२४ रोजी सकाळी ६.३० वाजता ड्रोन व्दारे शेतशिवारात पहाणी केली असता सदर वाघ मिळाला नाही. तेव्हा वडसा, आरमोरी व कुरखेडा येथील वनकर्मचारी मिळुन पाई संयुक्त गस्त केली असता सदर वाघ शिवराजपुर नियतक्षेत्रातील कक्ष क्र. ९३ मधील मिश्र रोपवनात १५.०० हेक्टर चे पश्चिम दिशेला चेनलिंग फेनसिंगचे आतमध्ये २० मीटर अंतरावर पडलेल्या अवस्थेत दिसला. प्रथमदर्शनी पाहता सदर वाघाचे उजव्या पायाला जखम असल्याचे दिसून आले.
दिनांक ०६.०२.२०२४ ते दिनांक ०८.०२.२०२४ पर्यत सदर वाघ त्याच परिसरात होता व तो कोणत्याही प्रकारची शिकार करण्यांस असर्मथ असल्यामुळे दिनांक ०८.०२.२०२४ रोजी सायंकाळी ३.४७ वाजता डॉ. रविकांत खोब्रागडे, पशु वैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) TATR तथा RRT TATR प्रमुख, अजय मराठे शुटर RRT TATR व त्यांची RRT TATR चमु यांनी सदर वाघास बेशुध्दीचे इंजेक्शन देवुन त्यास पकडले. सदर जखमी वाघास डॉ. रविकांत खोब्रागडे, पशु वैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) TATR तथा RRT TATR प्रमुख यांनी तात्काळ प्राथमिक उपचार करुन पुढील उपचाराकरिता त्याला मा. बाळासाहेब ठाकरे, आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय गोरेवाडा, नागपुर येथे हलविण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही धर्मवीर सालविठ्ठल, उपवनसंरक्षक (प्रा) वडसा, यांचे मार्गदर्शनाखाली पवनकुमार जोंग (भा.व.से.) परिविक्षाधिन अधिकारी, मनोज चव्हाण उपविभागीय वन अधिकारी कुरखेडा, विजय धांडे, वनपरीक्षेत्र अधिकारी (प्रा) वडसा, यांचे उपस्थितीत व वडसा परिक्षेत्रातील क्षेत्रीय कर्मचारी कराडे, तिजारे क्षेत्रसहाय्यक व गजभिये, वनरक्षक तसेच RRT TATR सदस्य योगेश लाकडे, वसीम शेख, प्रफुल वाडगुरे, गुरुनानक ढोरे, विकास ताजणे, दिपेश टेंभुर्णे, वाहन चालक (RRT), श्री अक्षय दांडेकर, अमोल कोरपे, वाहन चालक मनन शेख, वाहन चालक, वडसा वनविभाग वडसा यांचे सहकार्याने पार पडली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments