निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
09-02-2024
पालकांसाठी आनंदाची बातमी! राज्यातील सर्व माध्यमांतील चौथी पर्यंतच्या शाळा सकाळी 9 वाजल्यापासून
महाराष्ट्र शाळा: बदलत्या जीवनशैलीमुळे पहाटे शाळा असेल तर लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही, त्यामुळे लहान मुलांच्या शाळेच्या वेळेत शैक्षणिक वर्षापासून यामध्ये बदल केला जाणार आहे, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसकर यांनी केली आहे.
सकाळी मुलांची झोप पूर्ण होत नाही त्यामुळे शाळेमध्ये काही मुले झोपतात तर काही कंटाळवाणी देखील होतात त्यामुळे मुलांचे मन शिक्षक शिकवत आहे त्याकडे देखील लागत नाही, त्यामुळे लहान मुलांच्या शाळेचा टाईम बदलणे ही पालकांसाठी एक आनंदाची व चांगली गोष्ट आहे.
मुलांची झोप जर पूर्ण झाली तर ते दिवसभर ऍक्टिव्ह राहतात कंटाळवाणी होत नाहीत त्यामुळे हा निर्णय अतिशय पालकाच्या व विद्यार्थ्यांच्या दृष्टीने देखील योग्य आहे.
महाराष्ट्रामध्ये प्राथमिक शाळांचे वर्ग सकाळी (Maharashtra Education Department) भरतात तर माध्यमिक शाळांचे वर्ग दुपारी भरतात माध्यमिक शाळा मधील विद्यार्थ्यांचे वय 12 वर्षाच्या पुढे तर प्राथमिक शाळा मधील मुलांचे वय 03 ते 10 वर्षे असते त्यामुळे प्राथमिक शाळा दुपारी हव्यात आणि माध्यमिक शाळा सकाळी हव्यात अशी सूचना देखील शिक्षण मंत्र्यांनी केलेली आहे.
चौथीपर्यंतच्या शाळांची वेळ बदलली यामुळे आता या शाळेच्या वेळामध्ये बदल होणार आहे, आता चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी उशिरा भरवण्यात येणार आहे तर इतर वर्गाबाबत निर्णय घेण्यासाठी समितीची स्थापना देखील करण्यात येणार असल्याचे दीपक केसकर सरांनी यावेळी सांगितलेले आहे.
शाळांची वेळ बदलनार असल्यामुळे आता शहरी पालकांना दिलासा मिळणार आहे, बदलत्या जीवनशैलीनुसार प्रामुख्याने शहरी भागातील पालकांच्या झोपेच्या वेळा बदलल्या असून अनेक पालक रात्रपाळी आणि कामानिमित्त रात्री उशिरा उशिरापर्यंत जागी असतात, त्यामुळे मुले ही रात्री उशिरापर्यंत जागीच असतात या कारणांनी मुलांची झोप पूर्ण होत नाही.
सध्या सकाळच्या सत्रातील शाळा 07 वाजताच्या आसपास भरत असल्यामुळे कमीत कमी ही वेळ 9.00 पर्यंत पुढे नेल्यास किमान मुलांची झोप पूर्णपणे होऊ शकते तसेच पालकांची देखील धावपळ कमी होते त्यामुळे हा जो निर्णय आहे तो अत्यंत योग्य आहे.
त्यामुळे शाळा ही उशिरा सुरू करण्याबाबत सरकारने विचार करावे असे देखील राज्यपालांनी अलीकडे सुचविले होते याबाबत अंतिम निर्णय हा लवकरच घेतला जाईल असे देखील दीपक केसकर यांनी म्हटले आहे.
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments