RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
08-02-2024
महिलांच्या मदतीला पोलीस यंत्रणा! कॉल करा पोलीस हजर
सिंदेवाही /लाडबोरी: जिच्या हाथी पाळण्याची दोरी,तिच जगाचा उद्धार करी,आज मौजा लाडबोरी मधील महिलांनी गावा पासून अवैध दारू ला हद्दपार करायचे आणी एकही थेंब गावात येणार नाही या साठी गावात वॉर्डा वार्डात गट तयार करीत रात्रभर पहारा देत आहेत,याचं माय माहुल्या साठी आत्ता पोलीस निरीक्षक तुषार चव्हाण सुद्धा सरसावले असून कोणत्याही वेळी व मदत करण्याचे आश्वासन दिले, व त्यानुसार कृती करत आहेत,सिंदेवाही पोलीस स्टेशन च्या हद्दीत 90 गावे येतात या गावाच्या लोख्यसंख्येनुसार पोलीस स्टेशन मधील कर्मचारी वर्गाची संख्या कमी आहे,तरी पण दिवस रात्र आपले कर्तव्ये पूर्ण करण्यास कधीही तत्पर असतात,गावात रात्रीच्या सुमारास पेट्रोलिंग सुद्धा करत आहेत,त्या मुळे महिलांना सुद्धा अधिकच बळ मिळालं आहे,महिलांच्या व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून गावात शांतता व सुवस्था सध्या तरी प्रस्थापित झाली आहे,या महिला स्वतःच्या बळावर गावाचे रक्षण करीत आहेत,असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही,विशेष म्हणजे
शासनाकडून मानधन घेऊन रात्रीच्या सुमारास पोलीस पाटलाचे कोणतेच सहकार्य या महिलांना मिळत नाही ,आत्ता पर्यंत पोलीस पाटला विषयी खूप तक्रारी शासन दरबारी झाल्या आहेत पण प्रशासनाकडून कोणतीही कारवाही न झाल्याने आत्ता पण काही होणार नाही अशी मनधारणा पोलीस पाटलाची झाली आहे, पण जर या महिला फक्त सध्या शासन स्तरावरून पोलीस पाटलावर काय करावाही होणार याची वाट बघत आहे जर प्रशासनाने वेळेत योग्य कारवाही केली नाही तर या महिला संविधानिक मार्गाने चक्का जाम आंदोलन करण्यास मागे पुढे पाहणार नाही मग कायदा व सुवस्था राखण्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासानाची असेल असा इशारा या महिलां कडून देण्यात आला आहे.
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments