STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
02-02-2024
महिला मेळाव्याच्या माध्यमातून महिलांनी आर्थिक उन्नती साधावी : मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे आवाहन
आरमोरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे महिलांचा अभूतपूर्व सन्मान मेळावा संपन्न
*आरमोरी:-* पूर्वीच्या काळाप्रमाणे आता आधुनिक युगात महिला ही चूल आणि मूल या पुरती मर्यादित न राहता महिलांनी शासनाच्या विविध महिलांच्या योजनेचा उपयोग करून सामाजिक व आर्थिक क्षेत्रात महिलांनी आपली प्रगती साधावी व सरकारच्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे अन्न औषधी प्रशासन मंत्री राजे धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित केमिस्ट्री भवन येथे महिलांचा सन्मान मेळावा १ फेब्रुवारी २०२५४ रोजी आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य नाना नाकाडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे प्रमुख किशोर तलमले, माजी प्रदेश संघटन सचिव युनिस शेख, गडचिरोलीच्या युवती शहराध्यक्ष श्रेया कोष्टी, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष चेतन पेंदाम, आरमोरी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अमिन लालानी कार्याध्यक्ष सुनील नंदनवार, शहर अध्यक्ष प्रदीप हजारे, आरमोरी महिला तालुका अध्यक्षा वृषाली भोयर, महिला शहर अध्यक्ष संगीता मेश्राम, सोसिअल मीडिया जिल्हा अध्यक्ष दीपक बैस, सामाजिक न्याय विभाग जिल्हा कार्याध्यक्ष देवानंद बोरकर, वडसा तालुका अध्यक्ष संजय साळवे, युवक तालुका अध्यक्ष दिवाकर गराडे, पवन मोटवानी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी उपस्थित होते.
मेळाव्याला मार्गदर्शन करतांना राजे धर्मराव बाबा आत्राम पुढे म्हणाले, महिलाचे सशक्ति करण्याचा शुभारंभ खास महाराष्ट्राच्या शेवटच्या जिल्ह्यातून म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातून सुरुवात करण्यात आला आहे. महायुतीचे सरकार यांनी हा महिलांचा सन्मान करण्याचा मेळावा सुरू केला. या माध्यमातून महिलांचे विविध योजना त्या योजनेच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर करणे त्यासाठी सरकारने अंगणवाडी सेविकांना व मदतीस यांना आता स्मार्टफोन म्हणजे मोबाईल वाटपाचे धोरण सुद्धा हाती घेतलेले आहेत. महिलांच्या योजनांसाठी पुढील काळात आपण राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने मोठे मेळावे तयार करणार असून महिलांना सर्वतोपरी आरक्षण देण्याचे कार्य आहे नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी केलेले आहे महिलांसाठी विविध योजना त्यांनी सुरुवात केलेल्या असून आत्ताच नुकताच झालेल्या अर्थसंकल्पात महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी विविध योजनांचा समावेश या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने केलेला आहे आजपर्यंतच्या पन्नास वर्षाच्या कालखंडात खास करून राष्ट्रवादी काँग्रेसचा महिला मेळावा हा आरमोरी येथे आयोजित करण्यात आलेला आहे. हा अभूतपूर्व महिला मेळावा झालेला असल्याचे राजे धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना भाग्यश्री आत्राम म्हणाल्या महिलांसाठी मेळावा जिल्ह्यात आरमोरी तालुक्यात पहिल्यांदाच घेण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांना रोजगार कसा उपलब्ध करून देण्यात येईल सर्व महिलांना घरघर पाणी व्यवस्था कशी करण्यात येईल लखपती योजना ही दोन कोटी वरून तीन कोटी पर्यंत सरकारने केलेले आहेत तसेच जिल्ह्यात अतिक्रमण धारकांना वनपट्टे देण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले कार्यक्रमाला मार्गदर्शन नानाभाऊ नाकाडे यांनी केले त्यावेळी त्यांनी शासनाच्या महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या योजनांचा महिलांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहनही केले.
कार्यक्रमाचे संचालन कार्याध्यक्ष सुनील नंदनवार यांनी केले. प्रास्ताविक वृषाली भोयर महिला राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष यांनी केले तर आभार शहर अध्यक्ष प्रदीप हजारे यांनी मानले या मेळाव्यात प्रामुख्याने अनेक महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला यामध्ये पौर्णिमा राचमलवार, मंगला हजारे, देवका दुमाने, सारिका बांबोळे तसेच राकेश बेहेरे व्सराफा असोसिएशनचे सदस्य यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला.
मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी हेमराज प्रधान, राजू आकरे, सुरेंद्र बावणकर, योगाजी थोराक, नरेश ढोरे, प्रफुल राचमलवार, सुनील ढोरे, रवींद्र दुमाने, गणेश मंगरे, उदाराम दिघोरे, अनिल अलबनकर, उज्वला मंगरे, जयश्री भोयर, उर्मिला हर्षे, नलू आत्राम, गायत्री भोयर, अरुणा भोयर, कोकिळा गरफडे, मंजुषा हूड, इंदिरा हूड, गीता सपाटे, सारिका बांबोळे, डिम्पल बांबोळे, प्रमिला भोयर यांनी परिश्रम घेतले.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments