संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
31-01-2024
आष्टी पोलीस ठाण्यातील धडाकेबाज पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांची सोलापूर शहरात बदली
अनेक गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद करणारे यशस्वी ठाणेदार म्हणून विशेष ओळख.
चामोर्शी : आष्टी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष ठाणेदार कुंदन गावडे यांचा ठरलेला कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण करीत सोलापूर येथे बदली झाली आहे. गेल्या दोन महिन्याभरापासून बदलीची चर्चा सुरु होती.
दि. ३० जानेवारी रोजी मंगळवारी या संदर्भातील आदेश आले आणि कुंदन गावडे यांची सोलापूर शहरात बदली करण्यात आली.
आष्टी पोलीस ठाण्यात धडाकेबाज अधिकारी म्हणून त्यांची विशेष ओळख होती गेल्या दोन वर्षापूर्वी आष्टी ठाण्यात आलेले पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांनी आष्टी परिसरात अत्यंत कुशल आणि बंधुभाव जोपासत वचक बसविला. पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांनी आष्टी ठाण्याचा कारभार अतिशय योग्य पद्धतीने हाताळला. तपास यंत्रणा कार्यक्षम ठेवत गुन्हे आटोक्यात आणले. त्या प्रमाणेच घडलेल्या अनेक गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद करण्यात आले. हत्या, चोरी आणि अन्य गुन्ह्यातील आरोपींना शिताफीने ताब्यात घेत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न केले. अनेक धडाकेबाज कारवाया केल्या. अनेक मोठ मोठ्या गुन्हातील आरोपींचा मुसक्या दाबल्या . ठाणेदार कुंदन गावडे यांनी वेळोवेळी तपास कौशल्य दाखवून "गुन्ह्यांना माफी नाही" हे देखिल सिद्ध करून दाखविले.
आष्टी ठाण्यात विविध समाजाच्या बैठका घेऊन सर्वांना सोबत घेऊन वाटचाल केली.गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी अनेक प्रयत्न करीत सामान्य माणसाला जवळ करून त्याच्यावर कोणताही अन्याय होणार नाही याची काळजी बाळगली. प्रत्येक घटकसोबत मैत्रीपूर्ण संबंध जोपासले. कार्यकाळ खरच वाखाणण्याजोगा असून ज्या दिवशी पासून आष्टी येथे सेवेवर रूजू झाले तेव्हापासून आष्टी हद्दीत आमुलाग्र बदल घडून आला होता, सर्व सामुदायिक कार्यक्रम असो सांकृतिक असो, कायदेविषयक शिबीर असो त्यांचा मोलाचा सहभाग असायचा तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांवर त्यांचा जबरदस्त दरारा होता, त्यांच्या कारकिर्दीत त्यांचा चमूनेही चांगले प्रकारे कामगिरी केली. सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांनी समान वागणूक देवून कधीच, भेदभाव केला नाही.
तसेच तालुक्यातील सर्वच तक्रार कर्त्यांचे समाधान करून सर्व सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्याचा त्यांनी अहोरात्र प्रयत्न केला. सामान्यांना कधीच त्रास होऊ दिला नाही तर, गुन्हेगारांची गय सुध्दा केली नाही. त्यांच्या कार्यकाळात सर्वच धर्मियांच्या भावनेचा आदर करत त्यांनी आष्टी ठाण्यात अत्यंत कुशाग्र बुध्दीने आपले कर्तव्य पार पाडले. त्यांचा बदलीने आदेश येताच आष्टी ठाण्यात समस्त पोलीस कर्मचारीही भावूक झाले.
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments