ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
27-01-2024
क्रिडा व कला संमेलनातून विद्यार्थ्यांनी नाव लौकीक करावे,
माजी जि प सदस्य सैनुजी गोटा यांचे प्रतिपादन
आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्ये अनेक सुप्त गुण दडलेले असतात मात्र व्यासपीठ अभावी त्यांच्यातील सुप्त गुणांचा पाहिजे त्या प्रमाणात विकास होत नाही शालेय स्तरावर क्रीडा व कला संमेलन घेतले जात असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध होत असते विद्यार्थ्यांनी स्वतःमधील सुप्त गुणांचा विकास करून नाव लोकिक करावे असे प्रतिपादन माजी जि प सदस्य सैनुजी गोटा यांनी केले पंचायत समिती एटापल्ली अंतर्गत येणाऱ्या केंद्र गट्टा च्या वतीने क्रेंदस्तरीय बाल क्रिडा व कला संमेलनाचा उद्घाटन सोहळा सुभाषचंद्र बोस विद्यालय गट्टा येथे पार पडला त्यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते संमेलन अध्यक्षस्थानी सरपंच पूनम लेखामी ह्या होत्या प्रमुख अतिथी म्हणून माजी पं स सदस्या शिलाताई सैनु गोटा, पोलीस पाटील कन्नाजी गोटा, वैद्यकीय अधिकारी डॉ वड्डे, ग्रामसेवक मनोज मेश्राम, माजी सरपंच दोडगे गोटा, वनहक्क समितीचे अध्यक्ष तानेंद्र लेखामी , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोविंद शहा, उपाध्यक्ष दिलीप दहागावकर , भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे सहप्रमुख सूरज जक्कुलवार , विशाल पुजलवार , केंद्रप्रमुख एम सी बेडके, गाव भुमिया कोलू गोटा, ग्रा प सदस्य मिरावा लेखामि, ग्रा प सदस्य संजय गोटा, आरोग्य सेवक नामदेव वासेकर, सचिन मोतकुरवार, कैलाश गोरडवार आदी मान्यवर उपस्थित होते क्रीडा ही शारीरिक क्रिया आहे विद्यार्थ्यांनी खेळात स्वतःला हार मानून घेऊ नये , हरणे चुकीचे नसून प्रयत्न न करता हार मानने चुकीचे आहे असे मार्गदर्शन डॉ वड्डे यांनी विद्यार्थ्यांना केले
क्रीडा संमेलनात कबड्डी, खोखो, मॅरॅथॉन स्पर्धा , सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख एम सी बेडके यांनी केले, संचालन व आभार वाळवी शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत काटेलवार यांनी केले संमेलनाचे व्यवस्थापन गट्टा शाळेचे मुख्याध्यापक एल एम मारटकर यांनी केले क्रीडा व कला संमेलन यशस्वी करण्यासाठी डी पी ओंढरे, वसंत मडावी, संजय घुबडे, एच जे वेलादी, डी पी हलामी, वामन नवलू, पी एस कुडे, पतनीत सातपुते केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांनी सहकार्य केले
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments