निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
25-01-2024
खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस 5 वर्ष कारावास व 5000/- रुपये दंडाची शिक्षा दंड न भरल्यास 6 महिने वाढीव शिक्षा ठोठाविण्यात आली.
• गडचिरोली येथील मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश, यांचा न्यायनिर्णय
सविस्तर वृत्त असे आहे की, पोलीस स्टेशन धानोरा (पोमकें येरकड) हद्दीतील चुडीयाल गावात फिर्यादी नामे हिरामण सावजी ताडाम, वय ५५ वर्ष, रा. चुडीयाल, ता. धानोरा येथे पत्नी व दोन मुलांसोबत राहतात. तसेच फिर्यादी यांचे मजवी मुलगी नामे सौ. सपना हिचे लग्न तिन वर्षापुर्वी मौजा सिदेसुर येथे आरोपी नामे - वैभव सखाराम गावडे, रा. सिदेसुर याचे सोबत आदिवासी रितिरीवाजाप्रमाणे झाले. आरोपी हा दारु पिण्याचे सवयीचा असल्याने नेहमी दोघांमध्ये भांडण होत होते. भांडण झाल्यावर गावपातळीवर पंचायत करुन भांडणे अनेकवेळा मिटवण्यात आले. तरीही आरोपी याचे मध्ये काहीही सुधारणा न झाल्याने फिर्यादीने आपली मुलगी सपना व तिच्या दोन मुलांना स्वत: च्या माहेरी आणले असता दिनांक १२/०९/२०२० रोजी फिर्यादी रात्री जेवन करुन झोपलेले असतांना सुमारे ०९.३० वा. दरम्यान आरोपी दारुच्या नशेत येवुन मुलीला झोपेतून उठवुन व त्यांना मौजा सिंदेसुर येथे घेवून जातो असे म्हणत असतांना फिर्यादी याने उद्या सकाळी घेऊन जा असे म्हटले असता फिर्यादीला तुला माझ्या पत्नीला व मुलांना ठेवण्याचा काही अधिकार नाही असे उध्दट बोलुन आरोपीने आपले खिशातुन धारदार चाकु काढला व फिर्यादीच्या गळ्यावर चाकुने वार केला तेव्हा फिर्यादीने बाजुला ढकलुन आरडाओरडा केला असता तिथुन आरोपी पळून गेला, असे फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन धानोरा येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन धानोरा येथे दिनांक १४/०९/२०२० रोजी अप क्र. ६५/२०२० अन्वये कलम ३०७, ५०४ भा.द.वी. अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस दिनांक १६/०९/२०२० रोजी रात्रो ०९.५२ वा. अटक करून, तपास पूर्ण करून आरोपी विरुध्द सबळ पुरावा मिळून आल्याने मा. न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करुन सेशन केस क्र. २६/२०२१ नुसार खटला मा. सत्र न्यायालयात चालवुन, फिर्यादी व वैद्यकीय पुरावा, ईतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद मा. न्यायालयाने ग्राहय धरून दिनांक २५/०१/२०२४ रोजी वैभव सखाराम गावडे रा. सिदेसुर, पो. येरकड, ता. धानोरा जि. गडचिरोली यास मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश, श्री. आशुतोष नि. करमरकर गडचिरोली यांनी आरोपीस कलम ३०७ भा.द.वी. मध्ये दोषी ठरवुन ५ वर्ष शिक्षा व ५०००/- रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने वाढीव शिक्षा सुनावली आहे.
सरकार पक्षातर्फे सहा. जिल्हा सरकारी वकील श्री. निलकंठ एम. भांडेकर यांनी कामकाज पाहिले तसेच गुन्हाचा प्रथम तपास पोउपनि प्रशांत आर, कुंभार व अंतिम तपास पोनि विवेक बाबुराव अहिरे पोस्टे धानोरा यांनी केला. तसेच संबधीत प्रकरणात साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्गती करीता सेशन कोर्ट पैरवी अधिकारी व अंमलदार यांनी कामकाज पाहीले.
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments