अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
25-01-2024
गडचिरोली पोलीस दलातील 18 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मा. राष्ट्रपती यांचे “पोलीस शौर्य पदक व 01 अंमलदार यांना “गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक” जाहीर
देशभरामध्ये पोलीस दलात किंवा इतर सशस्त्र दलात उत्कृष्ट व शौर्यपुर्ण कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना प्रजासत्ताक दिनानिमीत्त शासनाकडून सन्मानित केले जाते. यावर्षी सुद्धा आज दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधेला गडचिरोली पोलीस दलातील 18 पोलीस अधिकारी व अंमलदारांना मा. महामहीम राष्ट्रपती यांचे “पोलीस शौर्य पदक” व 01 “गुणवत्तापुर्ण सेवासाठी पदक” जाहीर झाले आहे. संपूर्ण देशभरात एकुण 275 पोलीस शौर्य पदक व 753 गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक जाहीर झाले असून, त्यापैकी गडचिरोली पोलीस दलास 18 पोलीस शौर्य पदक व 01 गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक जाहीर झाले आहेत. ही निश्चितच गडचिरोली पोलीस दलासाठी अभिमानास्पद कामगिरी आहे. तसेच सन 2023 या वर्षामध्ये 62 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मा. राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक प्राप्त झाले होते. सन 2024 मध्ये एकुण 19 पोलीस अधिकारी/अंमलदार यांना मा. राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक व गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक प्राप्त झाले आहे.
पोलीस शौर्य पदक प्राप्त अधिकारी व अंमलदार, 1) श्री. सोमय विनायक मुंढे, भा.पो.से. पोलीस अधीक्षक लातुर, 2) श्री. संकेत सतीश गोसावी उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग करवीर जि. कोल्हापुर, 3) पोहवा/3078 मोहन लच्छु उसेंडी, 4) पोहवा/873 देवेंद्र पुरोषत्तम आत्राम (2ND BAR to PMG,)), 5) पोहवा/2734 जीवन बुधाजी नरोटे, 6) पोहवा/2612 माधव कोरके मडावी, 7) पोहवा/2474 संजय वत्ते वाचामी (1ST BAR to PMG,) 8) पोहवा/3029 मुंशी मासा मडावी 9) पोहवा/3047 गुरुदेव महारुराम धुर्वे, 10) पोनाअं/3729 कमलेश निखेल नैताम, 11) पोनाअं/3743 शंकर पोचम बाचलवार, 12) पोनाअं/3026 विनोद मोतीराम मडावी, 13) पोनाअं/4136 दुर्गेश देविदास मेश्राम, 14) पोअं/3718 विजय बाबुराव वडेट्टीवार, 15) पोअं/5488 कैलाश श्रवण गेडाम, 16) पोअं/4497 हिराजी पिताबंर नेवारे, 17) पोअं/5697 ज्योतीराम बापु वेलादी, 18) पोअं/1156 सुरज देवीदास चुधरी यांना पदक मिळाले असुन 01) सहा.फौ/3248 देवाजी कोट्टु कोवासे यांना गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक जाहीर झाले आहे.
वरील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या उल्लेखनिय व वैशिष्टयपुर्ण कामगिरीची दखल घेऊन मा. राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य व गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक जाहीर झाले असुन, त्याबद्दल मा. प्रभारी पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा. व मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) श्री. एम. रमेश सा. या सर्वांनी त्यांचे कौतुक केले आहे व त्यांच्या पुढील सेवेकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments