संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
24-01-2024
कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदभरती घोटाळ्याचे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच,राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे तालुका उपाध्यक्ष - सागर मूलकला यांची पाठिंबा ...!
सिरोंचा :- कृषी उत्पन्न बाजार समिती सिरोंचा कडून २१ जानेवरी रोजी झालेल्या पदभरती परिक्षेत मोठी घोटाळा देखील झाली आहे.
या पदभरती घोटाळा होण्याची शक्यत पूर्वीपासूनच असल्यामुळे या बाबतचे निवेदन दि.१७/०१/२०२४ चा रोजी तालुका कांग्रेस कडून जिल्हाधिकारी यांना देण्यात आले होते, तरी त्यावर कसलीही कारवाई झाली नाही.ज्याप्रकारे परिक्षा घेण्यात आली, तीसुध्दा संशयास्पद होती, प्रश्न पत्रिका सीलबंद नव्हत्या, उत्तरपत्रिकाही सुमार दर्जेची होत्या, व विद्यार्थ्यांना ओ.एम.आर. कॉपी शिट पुरवण्यात आली नाही, पर्यवेक्षांकडे कसलेही ओळखपत्र नव्हते, या सर्व बाबींना लक्षात घेउन विद्यार्थ्यांनी २१ जानेवरी २०२४ रोजी परिक्षा झाल्यानंतर देखील उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सादर झालेल्या पेपरची चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आले होते,
दिनांक २३/०१/२०२४ रोजी विद्यार्थ्यांची गुणसुची कृषी उत्पन्न बाजार समिती सिरोंचा येथील सूचना फलक येथे प्रसिध्द करण्यात आली आहे,
त्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती सिरोंचा येथील पदाधिकाऱ्याचे निकटवर्तीय व नातेवाईक यांनाच सर्वात जास्त गुण आहेत, त्यावर नवासहित यादी जाहीर करण्यात आली नाही,पदाधिकारी यांचे संबंधितांची बाजार समितीत विविध पदावर नियुक्त झाली आहे,
यात गरीब व मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाली आहे, त्यामध्ये जे विद्यार्थी नियुक्त झाली आहे, त्यांची व परिक्षा घेणाऱ्या संस्थेची देखील चौकशी झाली पाहिजे,
करिता जो पर्यंत घोटाळ्याची चौकशी होत नाही, तोपर्यंत बाधित परीक्षार्थींनी तालुका कांग्रेस पक्षातर्फे तहसील कार्यालय समोर आंदोलन सुरू केले आहे,
त्या आंदोलनाला तालुका राष्ट्रवादी काँग्रेस( शरद पवार) पक्षातर्फे उपोषण स्थळी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला आहे,
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments