अमित मेडिकल स्टोर & निर्मल जल, गडचिरोली
निर्मल जल शुद्धतात का वादा
23-01-2024
विसापूरातील युवकाची निर्घुन पणे केली हत्या बल्लारपूर तालुक्यातील खळबळजनक घटना
बल्लारपूर : तालुक्यातील विसापूर गावात सोमवारी अयोध्या येथील प्रभू रामचंद्र मूर्तीची प्रतिष्ठापनानिमित्त उत्साहाचे वातावरण होते. तो रात्री पंढरीनाथ देवस्थान जवळ आयोजित महाप्रसाद रात्री ९ वाजता दरम्यान घेतला. त्यानंतर तो घरी गेला.दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास त्याचेवर अज्ञातांनी चाकूने वार करून त्याची निर्घून खून केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीला आली. याप्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी तिघांना संशयीत म्हणून ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावात एकच खळबळ माजली आहे.सचिन भाऊजी वंगणे (३७) रा.विसापूर असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे.
सचिन वंगणे हा चालकाचे काम करत होता. त्याचे १२ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र त्याला दारूचे व्यसन असल्याने पत्नी व मुलगा त्याचे जवळ राहत नव्हते. त्याची वृद्ध आई मीराबाई वंगणे हिच त्याचा आधार होती. मात्र आई देखील त्याच्या व्यसनाला कंटाळून शेजारी झोपण्यासाठी जात होती.
काल सोमवारी सचिन हा दारू प्यायला. काही वेळ तो मिरवणुकीत देखील सहभागी झाला होता. रात्री ९ वाजता दरम्यान महाप्रसादाचे जेवण करून घरी दरवाजा समोर झोपी गेला. त्यावेळी आई मीराबाईने त्याला विचारपूस केली. तेव्हा त्याने आई तु मला सकाळी लवकर जागे कर. मला गाडी घेऊन जायचे आहे. म्हणून सांगितले. मंगळवारी सकाळी सचिनची आई त्याला जागे करण्यास गेली असता, तो घरी रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला असल्याचे दिसून आले. हा प्रकार पाहून आई मीराबाईने हंबरडा फोडला. दारूच्या व्यसनामुळे त्याचा नाहक अज्ञात मारेकऱ्यांनी जीव घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या घटनेची माहिती विसापूर चौकीचे कर्मचारी दुष्यंत गोडबोले, जीवन पाल व घनश्याम साखरकर यांनी बल्लारपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वरिष्ठाना कळविले. चंद्रपूर येथील स्थानिक गुन्हे अन्वेशन पोलीस निरीक्षक महेश कोंडवार,पोलीस निरीक्षक उमेश पाटील, पोलीस उप अधीक्षक दीपक साखरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास गायकवाड आदीने घटनास्थळी येऊन शासकीय कर्मचाऱ्यासमक्ष पंचनामा केला. या प्रकरणी विसापूर येथील तिघाना संशयीत म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
दारूच्या व्यसनाने केला घात
सचिन वंगणे याला दारूचे व्यसन जडले. यामुळे पत्नी पपीता ही त्याला सोडून मुलासह माहेरी पोंभुर्णा तालुक्यातील फुटाणा येथे १० वर्षांपासून राहत होती. घरी सचिन हाच वृद्ध आई मीराबाईचा आधार होता. मात्र तो दारू पिऊन आल्यावर आईला देखील शिवीगाळ करत होता. मात्र आईचे ममत्व सचिन हाच आधार होता. अचानक सोमवारी अज्ञात मारेकऱ्यांनी डाव साधला. त्याचा पोटावर, पाठीच्या मागे व जबरदस्त मारहाण करून सचिनचा जीव घेतल्यामुळे वृद्ध आईचे अवसान गळाले आहे. काही वर्षांपूर्वी लहान मुलाने देखील रेल्वे खाली येऊन आत्महत्या केली होती.
निर्मल जल शुद्धतात का वादा
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments