समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
20-01-2024
ACCIBIS Hotel online Rating कंपनीने वर्क फ्राम होम'च्या नावाखाली गडचिरोली करांना ऑनलाइन लाखो रुपयांचा घातला गंडा
गडचिरोली : वर्क फ्राम होमच्या नावाखाली जिल्ह्यातील नागरिकांना एका ऑनलाइन कंपनीने गंडा घातल्याचा प्रकार उजेडात आला आहे. दरम्यान, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जिल्ह्यातील नागरिक चिंतेत पडले आहेत
एकमेकांना व्हॉट्सॲपवर एक लिंक पाठवून ACCIBIS Hotel online Rating या कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगले रिटर्न मिळेल असे आमिष दाखविले.
ही नेटवर्क कंपनी असून, स्वत:च्या आयडी अंतर्गत अन्य लोकांना कंपनीशी जुळविल्यास अतिरिक्त बोनस मिळेल असे सांगण्यात आले. सुरुवातीला काही रक्कम गुंतविली. यानंतर रिटर्न पैसे मिळू लागले. यानंतर काही जणांनी आपल्या स्वत:च्या आई, बहिणीसह काही मित्र, मैत्रिणींनाही या कंपनीशी जोडले. यानंतर नेटवर्क वाढत जाऊन शेकडो जणांचे हे नेटवर्क झाले. सुरुवातीला रिटर्न मिळाल्याने पुन्हा हजारो रुपये यात गुंतविले होते. यानंतर अनेकांनी दहा ते २० हजार तर काही ५० हजारापर्यंत रक्कम या कंपनीत गुंतविली आहे.
सुरुवातीला कंपनीने रिटर्न दिले. मात्र, मागील काही दिवसांपासून गुंतवणूकदारांना रिटर्न येणे बंद झाले. गुंतवणूकदारांच्या आभासी आयडीवर रकमा जमा होत होत्या. मात्र, ते पैसे काढता येत नव्हते. काही गुंतवणूकदारांनी कंपनीला संपर्क साधला असता त्याचा भ्रमणध्वनी बंद दाखविला जात आहे. कोणताही संपर्क होत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सर्व गुंतवणूकदार चिंतेत पडले आहेत.
या कंपनी मध्ये शासकीय कर्मचाऱ्यांपासून तर सर्वसामान्य माणसाला या कंपनीने गंडा घातला आहे करीता अशा फसवणूक करणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांपासून सावध राहण्याची गरज आहे एकमेकांच्या सांगण्यावरून पैसे गूंतवण्यात आले पण हि कंपनी अधिकृत आहे काय याची चौकशी कोणी केली नाही
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments