अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
19-01-2024
भारतीय गौरवी परंपराचा अभिमान बाळगत पंचप्रणाचा अंगीकार करा -
बौध्दीक कार्यक्रमांत मार्गदर्शन
आष्टी:भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासीयांना पंचप्राण विकसित करण्याचे आवाहन केले. केंद्र सरकारच्यां पंचप्राण संकल्पनेनुसार प्र एकूण पाच उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहे .प्रामुख्याने पंचप्रण अंतर्गत विकसित भारताचे ध्येय ,गुलामगिरीतून मुक्तता, आपल्या गौरवी परंपरांचा अभिमान, एकता आणि नागरिकांमध्ये कर्तव्याची भावना हे उद्दिष्टे पंचप्राण संकल्पनेत अंतर्भूत आहेत. पंचप्रणच्या माध्यमातुन स्वातंत्र्याची भावना रुजविण्यासाठी आणि देशाच्या प्रगतीचा वेग वाढविण्याची आवड प्रत्येकामध्ये विकसित करावयाचे आहे. तरी प्रत्येकानी पंचप्रण आत्मसात करून देशसेवेच्या कार्यात उत्तरदायित्व निभावण्यास पुढाकार घेण्याचे आवाहन प्रा. ज्योती बोबाटे यांनी केले.
त्या वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचलित गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिरातील बौद्धिक कार्यक्रमप्रसंगी पंचप्रण या विषयावर बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा राजकुमार मुसळे होते तर यावेळेस केंद्रप्रमुख दिलीप बारसागडे माजी विद्यार्थी जगदीश कपाट उपस्थित होते. प्रा . डॉ.राजकुमार मुसने यांनी भारताचा इतिहास हा गौरवी आहे. येथील क्रांतीकारकांचे हौतातम्य युवा पिढीच्या मनात रुजविले गेले पाहिजे .आजच्या युवकांनी आपल्या क्रांतिकारकांच्या कार्याची जाणीव ठेवत पंचप्राण अंगिकारावे असे मार्गदर्शन केले. बौद्धिक कार्यक्रमाचे संचालन माधुरी गावडे हिने तर उपस्थितांचे आभार अक्षय नागपुरे यांनी मानले.
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments