संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
16-08-2023
गडचिरोली : स्वातंत्र्यपूर्वी काळापासुन लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर डॉ बाबासाहेब आंबेडकर तसेच अनेक महापुरुषांनी आपल्या लेखनी च्या प्रभावातुन तसेच वृत्तपञाच्या माध्यमातुन समाज प्रबोधन व समाज जागृती चे कार्य केले त्यामुळेच देश स्वातंत्र्य झाला.समाजातील अनिष्ठ रुढी परंपरावर आळा बसला आज समाजातील शैक्षनिक सामाजिक राजकिय बद्दल घडवुन आणण्यासाठी वृत्तपञ मोलाची कामगिरी बजावत असल्याचे प्रतिपादन आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व गडचिरोली जि.प.माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कांकडालवार यांनी केले.
देसाईगंज येथे आविसंचे सरसेनापती नंदुभाऊ नरोटे यांनी प्रकाशित केलेल्या साप्ताहिक गडचिरोली टाईम्स या वृत्तपञाचे विमोचन करतांना माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कांकडालवार यांनी म्हणाले.की स्वात्ञ्योत्त काळात ही देश्यात अनेक अनिष्ठ रुढी परंपरा सुरु असुन प्रस्थापित समाज व्यवस्थे कडुन दलित पिडित शोषित समाजावर आजही अन्याय अत्याचार होत असल्याच्या घटना घडत आहेत हिंसाचार बलात्कार भ्रष्टाचार आर्थिक फसवनुक असे अनेक प्रकार देशातील विविध भागात घडतांना दिसतात या सर्व समस्यांना वाचा फोडण्याचे काम समाजमाध्यम व वृत्तपञाच्या माध्यमातुन दररोज होत असतांना आपणास पहावयास मिळते शासन प्रशासन न्यायव्यवस्था यांचे काम सुरळीतपणे सुरु आहे.किंवा नाही याची मिमांसा करण्याचे काम वृत्तपञ करते म्हनुण देशाचा चौथा आधारस्तंभ म्हनुण वृत्तपञाची ओळख निर्माण झाली आहे.
सरसेनापती नंदुभाऊ नरोटे समाजसेवी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात शैक्षणिक अवस्थेतुन त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांचे मोठे संघटन उभे करुन विद्यार्थ्यांच्या व तळागळातिल जनसमुदायाच्या समस्या मार्गी लावण्यासाठी अनेक आंदोलने केली प्रशासनाच्या विरोधात मोर्चे काढले वस्तिगृहे सुरु करुन विद्यार्थ्यांना सुविधा मिळावी यासाठी नेहमीच पाठपुरावा केला आज जिल्ह्यामध्ये वस्तिगृहे सुरळित सुरु आहे हे नंदुभाऊंच्या संघटनेचे फलित आहे साप्ताहिक गडचिरोली टाईम्स या वृत्तपञाच्या माध्यमातुन नवी चळवळ उभी करुन या जिल्ह्यातिल कृषी क्षेञातिल समस्यांसह बेरोजगारींच्या व सामाजिक धार्मिक राजकिय व शैक्षणिक समस्यांना वाचा फोडण्याचे काम नंदुभाऊ नरोटे यांच्या वृत्तपञाच्या माध्यमातुन आपणास पहावयास मिळेल. अशा अजयभाऊ कांकडालवार यांनी या प्रसंगी व्यक्त केला.या प्रकाशन सोहळ्याला अ्ड संजय गुरु यांनीही शुभेच्छा दिल्या
यावेळी आरमोरी विधानसभाचे आमदार कृष्णा गजबे,प्रसंगी प्रेसक्लब अध्यक्ष प्रकाश दुबे,कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेन्द्र बुल्ले,जितेन्द्र परसवानी,धनपाल मिसार,प्रमोद करपते विस्तार अधिकारी भामरागड,रुपलता बोदेले सरपंच आमगाव,नितीन राऊत,राऊत मॅडम सरपंच संघटना जि.अध्यक्ष,मोहन पुराम सरपंच भटेगांव तथा अध्यक्ष महाग्रामसभा,सदाराम काटिंगे पञकार,पुरुषोत्तम भागडकर,पिंकु बावने मनोज ढोरे,शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष बालाजी ठाकरे,राजु बुल्ले माजी सरपंच सावंगी,सागर वाढई माजी नगराध्यक्ष,जेसाभाऊ मोटवानी नगरपंचायत माजी उपाध्यक्ष,मोतिलाल कुकरेजा,मनिषा नरोटे,रॉबिन्स नरोटे,शिवराम पुल्लूरी,नरेश गर्गम, मिथुन देवगडे, प्रमोद गोडसेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवार व नंदुभाऊ नरोटे मिञ परिवार तसेच काँग्रेसचे पदाधीकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments