रोज ब्युटी पार्लर
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
11-01-2024
श्रमदानाबरोबरच समाजसेवेसाठी स्वयंसेवकांनी पुढाकार घ्यावा -
क्षेत्र सहाय्यक संजयजी जुनघरे यांचे प्रतिपादन
फुले महाविद्यालयाच्या रासेयो शिबिराचे थाटात उद्घाटन
आष्टी - महात्मा फुले महाविद्यालयाचे एनएसएस शिबिर चपराळा या आडवळणाच्या पण नैसर्गिक दृष्ट्या समृद्ध गावात आयोजित केल्याबद्दल महाविद्यालयाचे मनापासून कौतुक.
विद्यार्थी मित्रांनो 1911 मध्ये स्थापना झालेले चपराळा येथील पुरातन विश्रामगृह प्राणहिता नदीकाठावर जंगलाच्या सानिध्यात निसर्ग समृद्धीने नटलेले आहे. आपण विश्रामगृहाला अवश्य भेट द्या. तिथून सूर्यास्ताचे अवलोकन करा आनंद मिळेल.25 फेब्रवारी 1986 ला चपराळा या अभयारण्याची निर्मिती करण्यात आली.134.78 चौरस मीटर वनक्षेत्रात वन्यजीवांचं वास्तव्य व वनसंपदेमुळे लौकिक आहे. इथल्या निसर्गाचा आनंद घेत स्वयंसेवकांनी श्रमदानाबरोबरच समाजसेवेसाठी पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन क्षेत्र सहाय्यक वन अधिकारी संजय जुनघरे यांनी केले. ते गोंडवाना विद्यापीठाची संलग्नित वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टी येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .संजय फुलझेले होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री जगताप, उपसरपंच दयानाथ कोकेरवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व्यंकन्ना बंटीवार ,छायाताई बीटपल्लीवार, मुख्याध्यापक पी. आर. उरेते, शुभम पुन्नेलवार, सुषमा कुलसंगे, सुरेश कोकेरवार , भारत पांडे ज्योती बोभाटे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ .राजकुमार मुसणे उपस्थित होते.
पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री जगताप यांनी विद्यार्थी जीवनातील श्रमसेवेचे महत्व पटवून देत विविध अंधश्रद्धा ,रुढी-परंपराचे उच्चाटन करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. उपसरपंच दयानाथ कोकेरवार यांनी स्वयंसेवकांनी गावाच्या समस्या समजून घेऊन त्या अनुषंगाने कार्य करण्याविषयी आवहान केले. प्राचार्य संजय फुलझेले लेयांनी शिबिराला शुभेच्छा देताना स्वयंसेवकाने जबाबदारीने श्रमनिष्ठा जोपासत विविध उपक्रम राबविण्याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन सहकार्यक्रम अधिकारी प्रा.ज्योती बोबाटे यांनी तर प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.राजकुमार मुसणे यांनी उपस्थितांचे आभार स्नेहल बट्टे हिने मानले.
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments