अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
05-01-2024
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गडचिरोली तसेच
NDRF पथक पुणे यांचे संयुक्त विद्यमाने पूरासंबधी टेबल टाँप एक्सरसाईज तसेच पूराचे माँक एक्सरसाईज संबंधी कार्यक्रम
दिनांक ०४.०१.२०२४ रोजी जिल्हा कार्यालय मध्ये नियोजन समिती चे सभागृह सकाळी ११.०० वाजता संपन्न झाला तसेच वैनगंगा नदी वरील कोटगल बँरेज येथे दुपारी २.०० वाजता पूराचे रंगीत तालीम कार्यक्रम संपन्न झालेला आहे.सदर कार्यक्रम जिल्हाधिकारी संजय मीणा ,अप्पर जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.सदर कार्यक्रमामध्ये आपत्ती व्यवस्थापन सल्लागार क्रिष्णा रेड्डी , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे ,एनडीआरएफ चे असिस्टंट कमांडंट निखिल मुधोळकर, टीम कमांडर धर्मेंद्र सेवदा, इन्स्पेक्टर पंकज चौधरी, इन्स्पेक्टर ईश्वर दास मते,इन्स्पेक्टर सुशांत सेठी यांचे उपस्थितीमध्ये पार पाडण्यात आला.सदर पूराचे रंगीत तालीम मध्ये नदीमध्ये पूराचे वेळी अडकलेल्या लोकांना बोटीचे सहाय्याने बाहेर काढण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करण्यात आले, तसेच पाण्यामध्ये बुडालेल्या लोकांना बोटीच्या सहाय्याने बचाव कसा करायचा याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करण्यात आले.सदर कार्यक्रमामध्ये एनडीआरएफ पथकाद्वारे पोहण्याचे प्रकार ,डिप डायव्हिंग तंत्र, डायरेक्ट काँन्टँक्ट तंत्र, इनडायरेक्ट काँन्टँक्ट तंत्र , बचाव तंत्र, इत्यादी महत्वपूर्ण बाबींची माहिती उपस्थित विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच आपदा मित्रांना देण्यात आले. सदर कार्यक्रमाकरीता एनडीआरएफ पथकातील२९ जवानांनी सहभाग नोंदविला तसेच कार्यक्रमाला पोलिस विभागाचे मोटार परिवहन विभागाचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश पोचमपल्लीवार, आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाकरीता आपत्ती व्यवस्थापन मध्ये महत्वपूर्ण भूमिका असणारे पोलिस विभाग,पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, नगर परिषद अग्निशमन दल, आपदा मित्र तसेच स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments