CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
05-01-2024
देशाला कर्जाच्या खाईत लोटणारी भाजप प्रणित मोदी सरकार - डॉ. नामदेव किरसान
भाजप सरकार म्हणजे महागाईचा भस्मासूर - डॉ. नामदेव किरसान
काँग्रेस सत्तेत असताना महागाई वाढली म्हणून रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे भाजपचे नेते आता कुठे गेले ? त्यांना वाढती महागाई आता दिसत नाही असा सवाल डॉ. नामदेव किरसान यांनी उचलत भाजप पक्षावर निशाणा साधला. महागाई वाढत असताना आता भाजपच्या नेत्यांना मात्र ती महागाई दिसत नाही. केवळ राजकारणासाठी विरोध करून जनतेला भूलथापा देण्याचे कार्य भाजप कडून केले जात आहे. जनतेच्या हितासाठी कधीतरी भाजपने कार्य केलेले मला दिसत नाही याउलट केवळ धर्माचे राजकारण करत जतिजातीमध्ये आणि धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे कार्य भाजप कडून केले जात आहे, असे विधान डॉ नामदेव किरसान यांनी व्यक्त केले. ते ३ जानेवारी रोजी कुरखेडा येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त, माळी समाज संघटना, ओबीसी समाज संघटना व सर्व मागासवर्गीय समाज संघटना तालुका कुरखेडा यांच्या वतीने "वनवा पेटला क्रांतीचा" या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना मोदी सरकारचा समाचार घेत पुढच्या पिढीसाठी आपण काय राखून ठेवलेलं आहे याची काळजी करणे गरजेचे असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले की, देशाची साधन संपत्ती सार्वजनिक उपक्रम सर्व विक्री करून मूठभर पूजीपतींच्या हवाली केले जात आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून सन 2014 पर्यंत म्हणजेच एकूण 70 वर्षात 55 लक्ष कोटीचे असलेले कर्ज मोदी सरकारच्या कारकिर्दीत फक्त नऊ वर्षात 100 लक्ष कोटीने वाढलेले असून आता एकूण कर्जाची राशी 155 लक्ष कोटी झालेली आहे. करिता सावध राहायची गरज असल्याचे आव्हान त्यांनी केले.
यावेळी माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी, आमदार कृष्णा गजबे, जिल्हाध्यक्ष किसान काँग्रेस कमिटी वामनराव सावसाकडे, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र चंदेल, भाजप तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, खुशाल मोहुर्ले, राम लांजेवार, माधव निरंकारी, नगराध्यक्ष अनिता बोरकर, रवींद्र गोटेफाटे, नगरसेविका आशाताई तुलावी, रामभाऊ वैद्य, केवळराम नाट, गणमान्य मंडळी व मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.
Redefine your style
book your appointment now
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments