संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
04-01-2024
बाबलाई माता वार्षिक पुजा - पारंपरिक इलाका समिति ग्रामसभा यात्रा संपन्न, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून आर्थिक मदत
माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून बाबलाई माता वार्षिक पुजा - पारंपारिक संमेलनासाठी आर्थिक मदत
भामरागड : तालुक्यातील बेजुर"या"गावाला लागून असलेल्या बेजुर कोंगा पहाडीच्या पायथ्याशी बाबलाई मातेच्या मंदिर आहे.येथील दर वर्षी आदिवासी व गैर आदिवासी बांधव मोठ्या उत्साहाने यात्राचे आयोजान करत असतात.जल जंगल जमीन याच्या वर आधारित असणारे आदिवासी बांधव नवीन वर्षाच्या अतुरतेने वाट बघत असतात.
१ जानेवारी ते ३ जानेवारी पर्यंत बाबलाई माता वार्षिक पुजा व सांस्कृतिक संम्मेलनाचे आयोजन भामरागड पट्टी पारंपरिक गोटुल समितिच्या वतीने करण्यात येते.माता बाबलाई"ही"आदिवासी बांधवांचे प्रमुख देवता आहे.शेकडो वर्षांपासून परिसरातील लोक इथे पारंपरिकरित्या एकत्रा येत असतात.
क्षेत्रात जानेवारी महिन्यात धान कापणी संपलेली असते आणि नवीन धान खायला सुरुवात व्हायची असते.आदिवासी समुदाया मध्ये कोणत्याही नवीन वस्तु खाण्यापूर्वी किंवा कामाला सुरुवात करण्यापूर्वी पंडूम म्हणजे पुजा केली जाते.धान हा इथला महत्त्वाचा पीक आहे.म्हणून लोक नवीन धान खायला सुरुवात करण्यापूर्वी पिंडी पंडूम करतात.
या निमित्याने क्षेत्रातील आदिवासी व गैर आदिवासी एकत्र येतात व बाबलाई मातेच्या पुजा करतात.आज या बाबलाई माता वार्षिक पुजा - सांस्कतिक संम्मेलानात आविसं - काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतू जी.मडावी यांनी उपस्थित दर्शवून मातेच दर्शन घेऊन"या"पूजासाठी आर्थिक मदत केली आहे.
यावेळी सुधाकर तिम्मा तालुका अध्यक्ष आविसं भामरागड,बालूभाऊ बोगामी तालुका अध्यक्ष काँग्रेस भामरागड,तेजस्विनी मडावी बालकल्याण सभापती भामरागड,कविता येतमवार स्वच्छता सभापती भामरागड,शशीरेखा आत्राम माजी पाणीपुरवठा सभापती भामरागड,लालसू आत्राम माजी पंचायत समिती सभापती भामरागड,विष्णू मडावी नगर उपाध्यक्ष भामरागड,प्रमोद आत्राम माजी सरपंच ग्रामपंचायत पेरमिली,राजू बड्डे माजी नगराध्यक्षा,रामाजी पुंगाटी,शुक्रम मडावी,श्यामराव येरकलवार,संतोष बडगेसह आविसं - काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील आदिवासी बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments