ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
02-01-2024
पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या पुढाकाराने ‘दारू नाही, दूध प्या’ म्हणत आष्टीत पोलिसांनी शालेय विद्यार्थ्यांसह काढली व्यसनमुक्ती रॅली
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जनजागृती
आष्टी : तरुणाईला व्यसनांपासून परावृत्त करण्यासाठी आष्टी पोलिसांनी नववर्षाच्या पहिल्या दिवसानिमित्त सोमवारी विशेष जनजागृती करणारी व्यसनमुक्ती रॅली काढली. यावेळी ‘दारू नाही, दूध प्या’ असा संदेश देत आंबेडकर चौकात सर्वाना दुधाचे वाटप करण्यात आले.
आष्टी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या पुढाकाराने राबविलेल्या या उपक्रमात राजे धर्मराव हायस्कूल आष्टी, महात्मा ज्योतिबा फुले शाळा आष्टी, तसेच सद्गुरू साईबाबा विज्ञान महाविद्यालय आष्टी येथील विद्यार्थी व शिक्षकवृंदाने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
या जनजागृती रॅलीच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात कशाप्रकारे व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला पाहुया
ही रॅली आंबेडकर चौक, शिवाजी चौक, हनुमान मंदिर ते पोलिस स्टेशन येथे पोहोचली. तिथे वर्क्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच बेबीताई बुरांडे आणि डी.डी.रॅाय उपस्थित होते. अध्यक्षस्थानी कुंदन गावडे होते.
वर्क्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक महात्मा ज्योतिबा फुले शाळेचा रोहित चटपालवार, द्वितीय कल्याणी आत्राम, तर तृतीय क्रमांक राजे धर्मराव स्कूलच्या तन्वी वागदरकर हिने पटकावला.त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले
सदर विशेष जनजागृती अभियान अंतर्गत व्यसनमुक्ती रॅली व वक्तृत्व स्पर्धा कार्यक्रम गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधिक्षक निलोत्पल अप्पर पोलीस अधिक्षक (प्रशासन) कुमार चिंता अप्पर पोलीस अधिक्षक (अभियान) यतीश देशमुख अप्पर पोलीस अधिक्षक एम. रमेश सारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुजीतकुमार जिमलगड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments