संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
01-01-2024
शेतकऱ्याने फिरवला मिरचीच्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर.
कोरपना : कापूस व सोयाबीन उत्पन्नात सतत घट होत आहे.त्यातच बाजारभाव गडगडल्याने बळीराजा चिंतातूर असून सततची नापिकी व कर्जपणामुळे अक्षरशः हतबल झाल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.याच पार्श्वभूमीवर आपल्या शेतीमध्ये पिकाची फेर पालट करावी म्हणून कोरपना तालुक्यातील जैतापूर येथील 50 वर्षीय पुरुषोत्तम महादेव गोनेवार,यांनी 2 एकर मिरची लागवड करण्याचे ठरविले.ऑगस्ट,सप्टेंबर महिन्यात मिरची लागवड ही केली.अशातच अतिवृष्टी,गारपिटीने झोडपले व शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.असे असताना नोव्हेंबर,डिसेंबर महिन्यात पडलेल्या पावसाने मिरची पिकावर चुरडा,करपा,पाणे खाणारी अळी,काला मावा,तुळतुळे,बोकड्या रोगाचा प्रादुर्भाव झाला.महागड्या कीटकनाशक औषधांचा वापर करून सुद्धा,पीक नियंत्रणात न आल्यामुळे अखेर हतबल होऊन सदर शेतकऱ्याने आपल्या 2 एकर मिरचीच्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवून पीक नष्ट केला आहे.
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments