निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
30-12-2023
मूलचेरा तालुक्यातील मलेझरी येथील भव्य ग्रामीण कबड्डी सामन्याचे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन
आदिवासी गोंड गोवारी युवा संघटना व गावकरी यांच्या तर्फे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांचा आदिवासी पारंपारिक वाद्याच्या गजरात स्वागत करण्यात आले.
मूलचेरा :तालुक्यातील मलेझरी येथे आदिवासी गोंड गोवारी युवा संघटना यांच्या कडून आयोजित भव्य ग्रामीण कबड्डी सामन्याचे उदघाटन भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. कबड्डी सामन्या चा उदघाटन पूर्वी गावात माजी आमदार दिपकदादा आत्राम यांचा आदिवासी पारंपारिक वाद्याच्या गजरात भव्य मिरवणूक काढून राष्ट्रीय शहीद विरबाबुराव शेडमाके,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण केल्यानंतर मैदानात जाऊन उदघाटन करण्यात आले.
या उदघाटन सोहळ्याला सह उदघाटक म्हणून माजी जि.प.सदस्या सौ अनिताताई दिपकदादा आत्राम,कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त तहसीलदार कुबडे साहेब प्रमुख पाहुणे म्हणून मूलचेरा नगरपंचायत च्या नगरसेविका सौ सुनीताताई रमेश कुसनाके,पोलीस पाटील सौ मारियाताई कोरडे,वेलगुर ग्राप उपसरपंच उमेश मोहूर्ले,डॉ अंकित झाडे,ग्रा.प.सदस्य विजय मांदाळे,ग्रा.प.सदस्य संदीप चौधरी,ग्रा.प.सदस्य विनोद झाडे,आविस जेष्ठ सल्लागार रामचंद्र शेडमाके,आविस जेष्ठ सल्लागार भगीरथ गायकवाड,साईनाथ नागोसे,किशोर नेवारे,रामदास सिडाम,वामनराव कंन्नाके,रामदासजी कोसनकर,किसन येलमुले,बंडू चांदेकर,हिरामण चौधरी,शिवदास झाडे,सुखदेव दुधे,दिलीप चल्लावार,तंटामुक्त अध्यक्ष धर्मपाल गोंगले, राहुल दुधे,संजय शेडमाके,गौतम चांदेकर,दिगंबर परचाके,रमेश मडावी,तुफिन गायकवाड,प्रवीण रेषे सह आविस व बीआरएस चे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी कबड्डी खेळाविषयी उपस्थित खेडाळु व नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले.
कबड्डी सामन्यात दोन गट ठेवले असून गट अ साठी प्रथम पुरस्कार माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडून तर गट ब साठी प्रथम पुरस्कार सौ अनिताताई दिपकदादा आत्राम माजी जि.प.सदस्या यांच्याकडून असे एकूण तीन बक्षीस ठेवण्यात आले.
आदिवासी गोंड गोवारी युवा संघटना यांच्या कडून आयोजित भव्य कबड्डी सामन्याचे उदघाटनीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बंडुजी बावणे यांनी मानले.या कबड्डी सामन्याचे उदघाटनीय सोहळ्याला मलेझरी, अडपल्ली सह परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. सामन्याच्या यशस्वीतेसाठी दिपक शेडमाके,आकाश नागोसे,मारोती मडावी,जितेंद्र परचाके,सचिन राऊत,राहुल कोहट,प्रणय शेडमाके,आकाश राऊत,शेखर पोरेते,स्वप्नील सुरपाम,मयूर बावणे यांनी परिश्रम घेतले.
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments