STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
29-12-2023
मद्यपींचा जुगाड पाहून पोलीस चक्रावले,पोलिसांनी पेट्रोलचा टँक तपासला तर त्यातून दारुच्या बाटल्या निघाल्या
गडचिरोली : दारुबंदी असलेल्या जिल्ह्यांमध्ये किंवा राज्यांमध्ये दारुची वाहतूक छुप्या मार्गाने केली जाते. अनेकदा दारु वाहतुकीसाठी वेगवेगळी शक्कल लढवण्यात येते. महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी आहे. गडचिरोलीत दारुची वाहतूक करण्यासाठी दोन तरुणांनी चक्क पेट्रोलच्या टाकीचा वापर केल्याचं समोर आलं. पेट्रोलच्या टाकीत तरुणांनी अनेक बाटल्या लपवल्या होत्या.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दारुबंदी असूनही दारुची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. चामोर्शी इथं दोन तरुण मोटारसायकलने दारुची वाहतूक करत होते. तेव्हा पोलिसांनी २६ डिसेंबर रोजी जुन्या आदिवासी मुलींच्या वसतीगृहाजवळ सापळा लावत दोघांना ताब्यात घेतलं. त्यानंतर पोलिसांनी पेट्रोलचा टँक तपासला तर त्यातून दारुच्या बाटल्या निघाल्या. दरम्यान, टँकमध्ये पेट्रोल आहे की नाही, मग गाडी कशी चालवली असा प्रश्न उपस्थित असलेल्यांना पडला.
पोलिसांनी जेव्हा गाडीच्या पेट्रोल टाकीत जर दारू आहे तर गाडी चालते कशी असं विचारलं तेव्हा तरुणांनी जे सांगितलं त्याने धक्काच बसला. पेट्रोल टँक गाडीला मॉडीफाय करून डिक्कीत बनवण्यात आले होते. पेट्रोल पुरवण्यासाठी जोडण्यात येणारी पाइप तिथून इंजिनला जोडली होती. तरुणांनी केलेला जुगाड पाहून पोलीससुद्धा चक्रावले. अवैध दारु वाहतूक प्रकरणी बाईक आणि दारुच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी दोघांवर गुन्हाही दाखल झाला आहे. पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील यांच्या नेतृत्वात पोलिस पथकाने पार पाडली.
आता ३१ डिसेंबर जवळ आल्याने दारूची अनधिकृत वाहतूक वाढली आहे. त्याला आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनात चामोर्शी पोलिसांनी विशेष मोहीम उघडली आहे. छुप्या पद्धतीने दारूची वाहतूक करणाऱ्यांचे मनसुबे साध्य होऊ नये यासाठी पोलिस दलाने देखील त्यांचे गोपनीय बातमीदार सक्रिय केले असल्याचे चामोर्शी ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांनी सांगितले
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments