निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
22-12-2023
नवरगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक नावाचा फलक पुनस्र्स्थापित करून फलक हटविणाऱ्यावर कारवाई करा, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
चामोर्शी : तालुक्यातील नवरगाव येथील बौद्ध समाजाच्या लोकांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये ग्रामसभेच्या ठरावानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक नावाचा फलक बौद्ध वस्तीत लावला होता परंतु ग्रामपंचायत नवरगाव ने दिनांक २१ डिसेंबर २०२३ रोजी प्रचंड पोलीस बंदोबस्तात सदर फलक काढून टाकला. हा फलक काढल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचा घोर अपमान झालेला असून समस्त आंबेडकरी अनुयायांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. ही घटना संपूर्ण मानवतेला काळीमा फासणारी व बौद्ध समाजाच्या मनात भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण करणारी आहे.या घटनेबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हा नाम फलक जुन्याच जागी पुनर्स्थापित करण्यात यावा. हा फलक हटविणाऱ्या ग्रामपंचायत नवरगाव येथील संपूर्ण पदाधिकारी, सदस्यावर कारवाई करण्यात यावी,हा फलक हटविणाऱ्या जातीयवादी मानसिकतेच्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना पदावरुन बडतर्फ करण्यात यावे,ही अमानवीय घटना घडल्यानंतर नवरगाव येथील बौद्ध समाजाच्या ५६ कुटुंबातील सुमारे २३२ लोकांनी दि २१ डिसेंबर ला आपल्या मुलाबाळांना घेऊन गाव सोडले व ते काल सायंकाळी शिवणी नाल्याच्या जवळ मुक्कामी थांबले ही माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांना कळताच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांच्या जवळ जावून आस्थेने चौकशी केली व त्यांच्या समवेत थांबले आज सकाळची त्याच्या जेवनाची व्यवस्था डॉ सहारे यांनी केली आहे त्यानंतर ते गडचिरोली येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर आले असल्याने त्यांची मालमत्ता (घरे, गुरे ढोरे, पिके इत्यादी असुरक्षित झाली आहेत. तरी बौद्ध समाजांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यात यावे. या प्रकरणात नामफलक हटविणाऱ्या वर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कारवाई करण्यात यावी. भविष्यात बौद्ध समाजावर अशा प्रकारचे अत्याचार होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी तसेच भविष्यात बौद्ध समाज नवरगाव यांचेवर कोणत्याही प्रकारचा छळ अथवा इजा पोहोचणार नाही याची सुद्धा काळजी घेण्यात यावी अशा मागण्यांचे निवेदन दिनांक २२ डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले असून या गाव सोडून आलेल्या बौद्ध बांधवांना अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष गडचिरोली केंद्रीय उपाध्यक्ष रोहीदास राऊत ,बहुजन रिपब्लिकन सोशालीस्ट पार्टी राज बन्सोड, गडचिरोली,शेतकरी कामगार पक्ष रामदास जराते गडचिरोली, मुव्हमेंट फॉर जस्टीस प्रतिक डांगे ,गौतम डांगे गडचिरोली, तुलाराम राऊत भारतीय बौद्ध महासभा गडचिरोली,गौतम मेश्राम संविधान फौंडेशन गडचिरोली, हंसराज उंदिरवाडे सम्यक समाज मंडळ गोकुळनगर सुखदेव वासनिक पंचशील बोद्ध समाज मंडळ, रामनगर, गडचिरोली, संपत गोडबोले सम्यक जेष्ठ नागरिक बहुउद्देशीय संस्था गडचिरोली, अमरकुमार खंडारे प्रबुद्ध बौद्ध मंडळ, विवेकानंदनगर, गडचिरोली, संविधान उत्सव समिती, गडचिरोली, अलोणे प्रबुद्ध विचार मंच, गडचिरोली, विनोद मडावी अखिल भारतीय आदिवासी युवा परिषद गडचिरोली, बाळकृष्ण सावसाकडे आम आदमी पार्टी, गडचिरोली विलास निंबोरकर महा अच्छा मिलन समिती, डॉ. महेश कोपुलवार भारतीय कॉमुनीष्ठ पार्टी,हरिदास कोटरंगे माळी समाज संघटना , कविता माहोरकर महीला जिल्हा काँग्रेस कमिटी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संजय कोचे, सुरेंद्र रायपुरे भीम आर्मी, केशव आलाम पारंपारिक आदिवासी परिषद, अमोल मारकवार भारतीय कॉमुनीष्ठ पार्टी ( मार्क्स), चक्रधर मेश्राम सैनिक समाज पार्टी,पोलीस मित्र महाराष्ट्र राज्य,ओबीसी आघाडी, शोभा खोब्रागडे,यांच्या सह एकुण एकोनतीस संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा दर्शविला आहे व निवेदनात त्यांनी स्वाक्षरी केलेली आहे
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments