RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
22-12-2023
बामणी येथे महिला सशक्तीकरण अभियान संपन्न
योजनांचा लाभ घेण्यासाठी महिलांची गर्दी
सिरोंचा:- पुरुषांसोबत महिलाही सक्षम व्हावे,त्यांना विविध योजनांचा लाभ मिळावा या उदात्त हेतूने विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ दिला जात आहे.महिलांना याचा मोठा फायदा होत असून केंद्र व राज्य सरकारचा महिला सशक्तीकरण हा अभिनव उपक्रम असल्याचे प्रतिपादन माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांनी व्यक्त केले.
सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम बामणी येथे (गुरुवार) २१ डिसेंबर रोजी महिला सशक्तीकरण अभियान घेण्यात आले,यावेळी त्या बोलत होत्या.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून येथील तहसीलदार जितेंद्र शिकतोडे, प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी पटले,तालुका कृषी अधिकारी बोबडे,वैद्यकीय अधिकारी मडावी,उप अभियंता नरवडे,ठाणेदार दांडे,माजी नगरसेवक रवी रालाबंडीवार,सत्यम पिडगू,समय्या कुळमेथे,मदनय्या मादेशी, रामकृष्ण नीलम,वेंकटापूर चे सरपंच अजय आत्राम,जाफराबाद चे सरपंच निर्मला कुळमेथे,गर्कापेठाचे सरपंच सूरज गावडे,जाफराबाद चे उपसरपंच स्वामी गोदारी आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना भाग्यश्री ताई आत्राम यांनी दुर्गम भागातील महिलांना तालुका मुख्यालय जाऊन योजनांचा लाभ घेणे शक्य होत नाही,त्यामुळे शासन आपल्या दारावर आल्याने विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ घेणे अधिक सोयीचे झाले आहे.त्यामुळे असे अभियानात महिलांनी पुढे येऊन पुरेपूर लाभ घ्यावे,असे आवाहन त्यांनी केले.अध्यक्ष स्थानावरून बोलताना जितेंद्र शिकतोडे यांनी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.ज्या महिलांकडे योजनांचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची अडचण भासत असेल तर त्यांनी थेट संपर्क करावा असे आवाहन केले.
बामणी येथील अभियानात विविध विभागाकडून स्टॉल लावण्यात आले होते.अभियानात बोरमपल्ली,कंबालपेठा, सिरकोंडा, जर्जपेठा, रोमपल्ली,वेनलाया, कोटापल्ली,झेंडा,दरशेवाडा, बोगटागुडम,बॉंड्रॉ, रेगुंठा,विठ्ठलरावपेठा, नरसिंहपल्ली,पर्सेवाडा,गर्कापेठा,बामणी आदी गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments