बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
21-12-2023
भामरागड ता.२०- हेमलकसा येथील प्रसिद्ध समाजसेवाकेंद्र तथा जेष्ठ समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे व डॉ.मंदाकिनी आमटे यांची कर्मभूमी ' लोक बिरादरी प्रकल्पाला ' २३ डिसेंबर २०२३ ला ५० वर्षे पूर्ण होत आहेत.त्यामुळे लोक बिरादरी प्रकल्पाच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापनदिनानिमित्त २० ते २६ डिसेंबरपर्यंत विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.आज (ता.२०)ला भामरागड परिसरातील आदिवासी बांधवांच्या विविध स्पर्धा पार पडल्या.
सर्वप्रथम ढोल -गजरांच्या तालावर उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.बिरसा मुंडा, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मयोगी बाबा आमटे व साधनाताई आमटे यांच्या प्रतिमांसमोर द्विप प्रज्ज्वलित करुन वंदन करण्यात आले.यावेळी जेष्ठ समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे, डॉ.मंदाकिनी आमटे, लोकबिरादरी हॉस्पिटलचे संचालक डॉ.दिगंत आमटे, डॉ.अनघा आमटे, लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे, शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कृत सीताराम मडावी, मुख्याध्यापक श्रीराम झोडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.तद्नंतर सांस्कृतिक खाद्य महोत्सव व मनोरंजन जत्रा पार पडली यांमध्ये बोत्ते जब्बा,येमिलजब्बा,लुमाजब्बा,तैमुलजब्बा,जेराजब्बा इत्यादी पारंपरिक आदिवासी पालेभाज्या व त्यांपासून बनविलेले विविध पदार्थ.गुंडेमाटी,कायामाटी,गोंदेमाटी, कोड्डेमाटी इत्यादी कंद व त्यांपासून बनविलेले विविध पदार्थ.इरपू,चिचू मिरया,आरकू,गोर्रा,कक्कु,कुहकु इत्यादी पारंपरिक आदिवासी वस्तूंपासून बनविलेले विविध पदार्थांचे प्रदर्शन व विक्री करण्यात आली.यामध्ये सावित्रीबाई फुले स्वयंसहाय्यता समुह राणीपोडूर-प्रथम,महिला बचतगट हिनभट्टी-द्वितीय, महिला बचतगट होडरी - तृतीय क्रमांक पटकावला.महिला बचत गट हलवेर,बेजूर,खंडीनैनवाडी,बोटनफुंडी,हेमलकसा येथील महिला गटांनी सहभाग घेतला होता.
आदिवासी बांधवांसाठी गुलेल स्पर्धा, रस्सीखेच स्पर्धा,पावड्या स्पर्धा घेण्यात आली.त्यानंतर गीतगायन स्पर्धा झाली.रात्री ७.३० ते १०.३०पर्यंत पारंपरिक नृत्य स्पर्धा व पारंपरिक वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली.तद्नंतर उलगुलान नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी हॉस्पिटलची चमूंनी अथक परिश्रम घेतले.
Your car is our responsibility
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments