RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
18-12-2023
ग्रामपंचायत स्तरावरील विविध संघटनांच्या आंदोलनात चामोर्शी तालुक्यातील ग्रामपंचायतींचा सहभाग
- ग्रामसंवाद सरपंच असोसिएशनची माहिती
प्रतिनिधी/चामोर्शी: ग्रामपंचायत स्तरावरील विविध न्यायीक मागण्यांसाठी ग्रामपंायत स्तरावरील ग्रामसेवक युनियन, संगणक परिचालक संघटना, ग्रामरोजगार सेवक संघटना, ग्रा.पं. कर्मचारी संघटना आदींनी 18 डिसेंबर ते 20 डिसेंबर पर्यंत कामबंद आंदोलन पुकारला आहे. या आंदोलनात चामोर्शी तालुक्यातील ग्रामंचायतींचा सहभाग असून तिन दिवस कोणत्याही कामकाजात सहभागी होणार नाही, असा निर्णय ग्रामसंवाद सरपंच असोसिएशनने चामोर्शी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून घेतला आहे.
ग्रामपंचायतती आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी उत्पन्न वाढ व कराचंी परिणामकारक वसुली या विषयावर ग्रामविकास विभागाने तातडीने बैठक घेऊन अनेक निर्णय घ्यावेत, आमदार निधीप्रमाणे स्वतःच्या वार्डाच्या विकासासाठी ग्रामपंचायत सदस्य निधी असावा, थकीत असलेला ग्रामपंचायत सदस्य भत्ता, सरपंच, उपसरपंच मानधन अदा करावे, त्यात भरीव वाढ करावी, दरमहा न मागता मानधन देण्यात यावे, 100 टक्के रक्कम शासनानेच द्यावी, विमा संरक्षण द्यावे, शासकीय कमिटीमध्ये स्थान देण्यात यावे, शासकीय विश्रामगृहात सवलतीच्या दरात निवास व्यवस्था व्हावी, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत पंचायत समिती सदस्य व ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाचा अधिकार असावा, शिक्षक पदवीधर यांच्याप्रमाणे राज्याच्या सहा विभागातून सहा सरपंच आमदार असावेत, जिल्हा परिषदांमध्ये सरपंच कक्ष तर मुंबईत निवा व्यवस्था, वाचनालाय, काॅन्फरन्स हाॅल असे सरपंच भवन असावे, या व अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
निवेदन देतांना ग्रामसंवाद सरपंच असोसिएशनचे चामोर्शी तालुकाध्यक्ष निलकंठ पा. निखाडे, सरचिटणीस शेषराव कोहळे, सुनिल कन्नाके, दिगाबर धानोरकर विवेक भगत सुधाकर गद्दे नंदा कुलसंगे अश्विनी कुमरे आदी उपस्थित होते.
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments