CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
02-08-2023
महसूल दिन उत्साहात, सप्ताहाचा शुभारंभ
गडचिरोली : जिल्ह्यातील गावपातळीवरील महसूल कर्मचाऱ्यांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वजण जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध आहेत. माणसाच्या जन्मापासून तर मृत्युपर्यंतच्या नोंदी ठेवण्यासाठी उपयोगी पडणारा महसूल विभाग प्रशासनाचा एक प्रमुख भाग आहे. म्हणूनच महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचा जिल्ह्याला प्रगतीपथावर आणण्यासाठी फार मोठा वाटा आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संजय मीना यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त पोलिस अधीक्षक कुमार चिंता, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी कणसे, उपजिल्हाधिकारी प्रसेनजीत प्रधान, तहसीलदार मोहन टिकले, सुनील सौदाने, नियोजन अधिकारी खडतकर, तहसीलदार संजय रामटेके आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी महसूल विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांचा सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला. यामध्ये नायब तहसीलदार डी.एस. ठाकरे, सेवानिवृत्त तहसीलदार संजय रामटेके, मंडळ अधिकारी आर.एस. गोरेवार, अव्वल कारकून ममता शेंडे, स्विय सहाय्यक प्रवीण गुज्जनवार, नायब तहसीलदार अमोल गवारे, सी.एच. चिमलवार यांचा समावेश होता. याप्रसंगी जिल्हाधिकारी संजय मिना यांच्या हस्ते नागरिकांना रेशन कार्डचे वितरण, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र, संजय गांधी योजना व श्रावणबाळ योजनांतर्गत लाभार्थ्यांना मासिक अनुदानाचे प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे संचलन डी.एम.दहीकर यांनी तर आभार अमोल गव्हारे यांनी मानले.
संपूर्ण राज्यात आजपासून महसूल सप्ताहाचा शुभारंभ झाला आहे. 2 ऑगस्टला युवासंवाद, 3 ऑगस्टला एक हात मदतीचा, 4 ला जनसंवाद महसूल अदालतचे आयेजन, 5 ला सैनिकहो तुमच्यासाठी, 6 ला महसूल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्तांचा संवाद कार्यक्रम आणि 7 ऑगस्टला महसूल सप्ताहाचा समारोप होणार आहे
Redefine your style
book your appointment now
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments