STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
13-12-2023
कोल्हापूरची अमृता पुजारी ठरली महाराष्ट्र महिला केसरी.…
राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विजय वडेट्टीवार मित्र परिवार व तालुका कुस्तीगिर संघ ब्रम्हपुरी यांचे संयुक्त विद्यमाने ब्रम्हपुरी येथे तीन दिवसीय महाराष्ट्र महिला केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली.
आयोजित स्पर्धेत राज्याच्या कानाकोपऱ्यातून 600 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.दि.१२ डिसेंबर २०२३ रोजी या कुस्ती स्पर्धेचा समारोप करण्यात आला.
राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना चांगलाच रंगला. यात कोल्हापूरची अमृता पुजारी हिने सामन्याच्या अंतीम क्षणी सांगलीच्या प्रतीक्षा बागडी हीचा पराभव करीत महाराष्ट्र केसरीचा (दुसरा) किताबाची माळ आपल्या गळ्यात घातली. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी किरण विजय वडेट्टीवार यांचेसह विजेत्यांचा सपत्नीक चांदीची गदा, रोख पारितोषिके, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव केला.
याप्रसंगी प्रामुख्याने किरण ताई वडेट्टीवार, युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, ॲड. राम मेश्राम, डॉ. नामदेव किरसान, प्राचार्य जगनाडे, ब्रम्हपुरी नगराध्यक्ष रिता उराडे
काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष खेमराज तिडके, न. प. गटनेता विलास विखार, नगरसेवक डॉ.नितीन उराडे, कृउबा सभापति प्रभाकर सेलोकर तालुका काँग्रेस कमिटी ब्रम्हपुरी चे सर्व पदाधिकारी, कुस्तीगीर संघाचे महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी व स्पर्धक उपस्थित होते.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments