संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
13-12-2023
जारावंडी ग्रामपंचायतीच्या एका सदस्याचे सदस्यत्व रद्द,ग्राम पंचायतचे काम करणे पडले महागात,गमावले पद
एटापल्ली तालुक्यातील जारावंडी येथे गावातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी रस्त्यावर मुरूम टाकण्याकरिता भावाचे ट्रॅक्टर लावून स्वतःच्या नावे धनादेश घेतला. त्यावर ग्रामपंचायत सदस्याने आक्षेप घेतला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घेऊन संबंधित ग्रामपंचायत सदस्यास अपात्र केले.
दिलीप जीवन दास असे अपात्र ठरलेल्या ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे. जारावंडी ग्राम पंचायत च्या रस्त्यावर खड्डे बुजविण्यासह बाजारात गाळ भरण्यासाठी आपल्या भाऊ निर्मल जीवन दास यांचे ट्रॅक्टर (सीजी ०५ जी- ३२५३) किरायाने घेतले होते. एकूण ३५ हजार ५० रुपये इतक्या किरायाची
रक्कम सरपंच व सचिव यांनी दिलीप जीवन दास यांना धनादेशाद्वारे वितरित केली.
स्वतः ग्रामपंचायत सदस्य असताना व ट्रॅक्टर मालकीचे नसतानाही धनादेश उचलल्याप्रकरणी ग्रामपंचायत सदस्य मुकेश कावळे यांनी पुराव्यासह जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्याकडे आक्षेप नोंदवला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घेतली ग्रामपंचायत सदस्य दिलीप दास यांचा खुलास अमान्य करत त्यांना अपात्र केले.
याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी जारी केले. त्यामुळे ग्रामपंचायतमध्ये नातेवाइकांच्या नावाखाली कामे करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना दणका बसला आहे.
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments