बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
12-12-2023
"त्या" गुन्हातील आरोपी अटकेत
ब्रह्मपुरी:- खेडमक्ता रोडवर वखार महामंडळाच्या गोदामासमोर एका मुलाचा मृतदेह आढळून आला.
सदर घटनेची खबर मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे आणि पोलिस निरीक्षक
अनिल जिट्टावार हे घटनास्थळी आपल्या ताफ्यासह दाखल झाले .
पोलिसांनी सदर प्रेत ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्याकरीता ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे नेले.
शवविच्छेदन अहवालानुसार मृतकाच्या गुप्तांगावर , छातीवर , व पोटावर मार असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी साक्षीदारांच्या नोंदविलेल्या बयानावरून व परिस्थितीजन्य पुराव्यावरून मृतकाचा मित्र रवी उर्फ रेवनाथ नानाजी सहारे याला अटक करून त्याचावर अप.क्र ६१२/२०२३ नुसार भांदवी कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर घटना ही दारू पिण्याच्या कारणांवरून घडली असून आरोपीने पवन धोटे याला जिवानिशी ठार मारून त्यास ओढत नेऊन रोडचे खाली नेऊन टाकले व तिथून निघून गेल्याचे कबूलीजबाबात सांगितले .
आरोपी रवी उर्फ रेवनाथ सहारे हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याच्यावर भांदवी कलम ३५३ आणि भांदवी कलम ३२४ सारखे गुन्हे दाखल आहेत .
आरोपीला आज ब्रम्हपुरी न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश एस.डी.चक्कर यांनी आरोपीला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव कोडवते करीत आहेत.
Your car is our responsibility
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments