STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
11-12-2023
रुपयासाठी बाबासाहेबांनी ब्रिटिशांना धारेवर धरले:भाग्यश्री ताई आत्राम
भारतीय अर्थव्यवस्थेत डॉ बाबा साहेबांचे अर्थशास्त्रीय योगदान या विषयावर चर्चासत्र
अहेरी :- खडतर परिस्थितीत शिक्षण घेवून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी रुपयाची समस्या हा प्रबंध सादर केला. लंडन मध्ये वास्तव्य करून ब्रिटिशांवर बोचरी टीका करुन बाबासाहेब आंबेडकर यांनी हा प्रबंध सादर केला. भारतीय रुपयासाठी ब्रिटिशांना धारेवर धरणारे बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव व्यक्तिमत्त्व होते असे मत माजी जि प अध्यक्ष व सिनेट सदस्या भाग्यश्री ताई आत्राम यांनी व्यक्त केले.
एम्प्लॉइज फॉर पीपल्स अँड स्टूडेंट अहेरी कडून आयोजीत चर्चासत्रात त्या बोलत होत्या. भगवंतराव शिक्षण महाविद्यालय अहेरी येथे डा बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय अर्थव्यवस्थेत अर्थशास्त्रीय योगदान या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य विष्णू सोनवणे होते. प्रमुख वक्ते डा वामन गवई अमरावती, बाबाराव गायकवाड अमरावती होते. प्रमुख उपस्थिती मलय्या दुर्गे, देवाजी अलोणे यांची होते.महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
पुढे बोलताना बाबासाहेबांचा अर्थशास्त्रीय व्यासंग खूप मोठा आहे. म्हणूनच देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्यांच्या विचारांचा मोठा प्रभाव आहे. मुद्रे संदर्भात निर्णय घ्यायला एक स्वायत्त संस्था असावी अशी आग्रही भूमिका त्यांनी रुपयाची समस्या या ग्रंथात मांडली. आणि त्यातून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ची निर्मिति झाली हे कुणीही विसरू शकत नाही असे त्या म्हणाल्या.
आयोजीत कार्यक्रमाचे संचालन महेश मडावी यांनी केले. प्रास्ताविकातून संघटनेची भूमिका आणि विषयाचे महत्व प्रा किशोर बुरबुरे यांनी समजावून सांगितले. आभार प्रा नामदेव पेंदाम यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य रतन दुर्गे,सुरेंद्र आलोने, संदीप सुखदेवें, आनंद आलोणे, अड पंकज दहागवकर इत्यादींनी घेतले.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments