ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
05-12-2023
अहेरी येथून विदर्भ निर्माण जनजागरण यात्रेला प्रारंभ; आष्टीत जल्लोषात स्वागत
चामोर्शी: अहेरी येथून स्वतंत्र विदर्भ राज्य विदर्भ मिशन 2023 अंतर्गत ‘विदर्भ मिळवू औंदा’ विदर्भ निर्माण जनजागरण यात्रेला स्व. राजे विश्वेश्वरराव महाराज चौकाततून प्रारंभ करण्यात आला. यावेळी सर्व विदर्भ प्रेमी एकत्रित होऊन विठ्ठल रखुमाई मंदिर आवारात असलेल्या स्व. राजे विश्वेश्वरराव महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून वेगळ विदर्भ राज्य मिळविणारच अशी घोषणा देऊन संकल्प यात्रेच्या रथाला मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखविली. व तालुक्यातील आष्टी येथे विदर्भ राज्य आंदोलन समिती जनजागरण यात्रेचा डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.
स्व. राजे विश्वेश्वरराव महाराजांचा वेगळ्या विदर्भाचा स्वप्न होता. त्यासाठी मरेपर्यंत त्यांनी नाग विदर्भ आंदोलन समितीच्या माध्यमातून संपूर्ण विदर्भात लढा दिला. त्यांच्या निधनानंतर ही त्यांची प्रेरणा घेऊन विदर्भ राज्य आंदोलन समितीने पुढचा विडा उचलला आहे. विकास, निधी, विदर्भातील तरुणांच्या हाताला रोजगार, शेतकर्यांना सिंचन व विजेची हमी, रस्ते व हक्काच्या नोकर्यांवर अधिकार मिळवून विदर्भाचे मागासलेपण नवीन विदर्भ राज्य निर्मितीमुळे दूर होऊ शकते. त्यामुळेच विदर्भाच्या स्थायी विकासासाठी एकमेव पर्याय म्हणजे वेगळा विदर्भ राज्य निर्मिती असल्याचे माजी आमदार वामनराव चटप यांनी यावेळी सांगितले.
नागपूर करारानुसार महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर विदर्भाच्या जनतेला विकासाच्या मूलभूत सोयी व निधी पाहिजे त्या प्रमाणात न मिळाल्याने 19 ऑक्टोबर 1957 ला धर्मराव शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार राजे विश्वेश्वरराव महाराज यांनी नाग विदर्भ आंदोलन समिती काढून वेगळ्या विदर्भाची ज्योत लावली होती. याची धग आता पेटली असून 31 डिसेंबरपर्यंत ’विदर्भ घेऊ किंवा जेल जाऊ’ तसेच गडचिरोली जिल्ह्यातील रोजगार निर्मिती घेऊन बेरोजगारांचे स्थलांतर थांबवू अशी भूमिका घेऊन विदर्भ जन आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांसह अहेरीतून संकल्प यात्रेला शुभारंभ करून रणसिंग फुंकले आहे.
यावेळी समितीच्या महिला अध्यक्ष रंजना मामुर्डे, समितीचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष मनोहर गेडाम, जिल्हाध्यक्ष अशोक पोरेड्डीवार, दिवाकर कुंदोजवार ग्रामपंचायत सदस्य आष्टी,शंकर पाटील मारशेट्टीवार, सेवानिवृत्त मंडळधिकारी सत्यवान भडके, शेखर खर्डीवार, महेंद्र बाबा आत्राम,अरुण शेडमाके, विजय खर्डीवार, साईनाथ अप्पनवार, विजय बहिरेवार,यासह नागरिक उपस्थित होते.
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments