ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
05-12-2023
कोनसरी परिसरातील जमिनींचे भूमी अधिग्रहण रद्द करा
- परिसरातील सरपंचांचे ना. धर्मरावबाबा आत्राम यांना निवेदन
प्रतिनधी/ चामोर्शी: महाराष्ट्र शासनाने कोनसरी परिसरातील कोनसरी, जैरामपूर, मुधोली चक नं. 1, मुधोली चक नं. 2, पारडीदेव आणि सोमनपल्ली या गावाच्या हद्दीतील एकूण 898.8422 हेक्टर जमिन शासनाने खाजगी व सरकारी क्षेत्र भुमी अधिग्रहण करण्याचा आदेश काढलेला आहे. यामुळे परिसरातील शेतकरी संकटात येणार असल्यामुळे सदर भूमी अधिग्रहण रद्द करण्यात यावे, अशी मागणी ग्रामसंवाद सरपंच असोसिएशनच्या वतीने अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शासनाने भूमि अधिग्रहणाचा आदेश काढलेला असून 898.8422 हेक्टर आर जमिनीपैकी काही क्षेत्र लाॅयड्स मेटल कंपनी आणि काही क्षेत्र वरात इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीमध्ये विभागणी करून देण्यात येणार आहे. परंतु अधिग्रहीत करण्यात येत असलेली जमिन ही या परिसरातील शेतकÚयांच्या चरितार्थाचे एकमेव साधन आहे. या निर्णयामुळे सबंधित शेतकरी संकटात सापडणार आहेत. यामुळे शासनस्तरावर या प्रकरणाची चैकशी करून अधिग्रहण रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदन देतांना ग्रा.पं. कोनसरीचे सरपंच श्रीकांत पावडे, उपसरपंच रतन आक्केवार, सोमनपल्ली ग्रा.पं. चे सरपंच तथा ग्रामसंवाद सरपंच असोसिएशनचे चामोर्शी तालुका अध्यक्ष निलकंठ पा. निखाडे, उपसरपंच निलेश मडावी, मुधोली चक नं. 2 च्या सरपंचा अश्विनी रोशन कुमरे, उपसरपंच किशोर खामनकर, जैरामपूर ग्रा.पं. च्या सरपंचा दिपाली सुधीर सोयाम, उपसरपंचा छाया सिताराम भोयर, मुधोली चक नं. 1 च्या सरपंचा शकुंतला रवींद्र डेकोटे, उपसरपंच दिलीप वर्धलवार, सोमनपल्ली ग्रा.पं. चे सदस्य निनाद देठेकर, अरूण बंडावार, दिलीप मानापुरे, सचिन बारसागडे, प्रशांत पावडे, संजय कुमरे, बापुजी भोगेकर, रविंद्र कावडे, लक्ष्मण मोहुर्ले, राजु चनेकार, बंडु गुरनुले, दशरथ पोतराजवार, दुर्गा चनेकार आदी उपस्थित होते.
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments