अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
05-12-2023
लॉयड्स इनफिनाईट फाऊंडेशन आणि लाईट ऑफ लाईफ ट्रस्टतर्फे ३ दत्तक शाळांच्या नूतनीकरणाचे काम सुरू
चंद्रपूर: येथील प्रियदर्शिनी कन्या विद्यालय घुग्घुस, इंदिरा गांधी विद्यालय पडोली व न्यू इंग्लिश हायस्कुल पांढरकवडा येथे लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट व लॉयड्स इन्फिनाइट फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने वरील तिन्ही शाळे मध्ये आनंदो शाळा सक्षमीकरण कार्यक्रमा अंतर्गत शाळा नूतनीकरण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये शाळांच्या गरजेनुसार पेवर ब्लॉक,
दरवाजे व काचेच्या खिडक्या,विद्युत जोडणी व साहित्यांची पूर्तता, शाळेतील छताच्या नूतनीकरणाचे काम,वर्ग खोल्यामधील फरशी चे काम,विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे म्हणून वॉटर कुलर,वॉटर फिल्टरची पूर्तता इत्यादी काम चालू करण्यात आले आहेत.
सत्राच्या सुरुवातीलाच तिन्ही शाळांमध्ये ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष देण्यात आलेले आहे. सोबतच इयत्ता ८ वी ते १० वीच्या सर्व विध्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आलेले आहे.हे काम प्रकल्पाच्या व्यवस्थापिका कांचन थोरवे,प्रकल्प समन्वयक मुकेश भोयर व लॉयड्सच्या सीएसआर विभागाच्या नम्रपाली गोंडाने यांच्या नियंत्रणात चालू आहे. विध्यार्थ्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा व प्रसन्न वातावरण मिळावे व विध्यार्थ्यांमध्ये नवचेतना निर्माण होऊन विध्यार्थ्यानी उत्साहाने शिक्षण घ्यावे हा आनंदो शाळा सक्षमीकरण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments