RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
04-12-2023
जिल्ह्यातील हजारो अंगणवाडी महिला रस्त्यावर,बेमुदत संप
गडचिरोली : अंगणवाडी महिलांच्या प्रश्नांला घेउन अंगणवाडी कृती समितीचे वतीने ८ डीसेंबर पासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. राज्यातील लोन लाख अंगणवाडी महिला या संपात सहभागी होतील. अंगणवाडी महिलांना कर्मचाऱ्याचा दर्जा दया, तो पर्यंत किमान वेतन २६,००० रुपये देण्यात यावे, आश्वासन दिल्या नुसार अंगणवाडी महिलांना मानधनाचे निम्मे पेंशन तथा ग्रज्युटी देण्यात यावी. या प्रमुख मागणीला घेउन बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. या निमित्ताने जिल्हा परीषदे समोर संघटनेच्या वतीने धरणा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. एक हजाराहून जास्त अंगणवाडी महिला या धरणा कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. संघर्ष हमारा नारा है भावी इतिहास हमारा है अंगणवाडी महिलांना कर्मचाऱ्याचा दर्जा मिळालाच पाहीजे, अंगणवाडी महिलांना कर्मचाऱ्याचा दर्जा मिळालाच पाहीजे, अंगणवाडी महिलांना किमान वेतन सव्वीस हजार रुपये मिळालंच पाहीजे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करून अंगणवाडी महिलांना ग्रॅज्युटी लागू करा, मानधनाचे निम्मे पेंशन मिळालेच पाहीजे, आदि घोषणा देण्यात आल्या. मार्गदर्शनपर भाषणात प्रा. दहीवडे म्हणाले जनतेने निवडून दिलेल्या आमदार खासदाराच्या भविष्याचा विचार करुन त्यांना पेंशन दिली जाते. तर हेच आमदार जनतेच्या भविष्याचा विचार का करीत नाही. केवळ आश्वासन देतात परंतु त्यांची अंमलबजावणी केल्या जात नाही. पेंशन तथा ग्रॅज्युटी देण्यात येईल. असे आश्वासन विधान सभेत देण्यात आले आठ महिण्याचा कार्यकाल लोटण्यात आला. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. अंमलबजावणी झाली पाहीजे याच मागणीला घेऊन हा बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. अमोल मारकवार म्हणाले कामगाराला संघर्षा शिवाय काहीच मिळत नाही. देशात लोकशाही असली तरी या लोकशाहीचे भांडवलशाहीत रुपांतर झाले आहे. आणि म्हणूनच गरीब दिवसेन दिवस गरीब होतांना पहावयास मिळते. तर भांडवलदार अती श्रीमंत होत आहे. गोरगरीब जनतेवरील अन्याय सतत वाढत आहे. आणी अन्यायाचा विरोध केला तर तो दुर करण्याऐवजी सरकारची दडपशाही दिवसें दिवस वाढत आहे. या दडपशाहीचा संघटीतरीत्या आपण प्रतिकार केला पाहीजे. प्रमोद गोडघाटे, अरुण भेलके, राजेश पिंजरकर यांचे ही मार्गदर्शनपर भाषणे झाली. उज्चला उंदीरवाडे यांचे आभारप्रदर्शना नंतर धरणा कार्यक्रम संपला. धरणा कार्यकम यशस्वी करण्याकरीता भारती रामटेके, कौशल्या गौरकार, ज्योती बेंजकीवार, छाया कागदेलवार, सुशिला कार, सुनंदा बावणे, सुमन तोकलवार, सुनंदा उईके, योगीता मुनघाटे, यांनी विशेष परीश्रम घेतले.
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments